११ चांपेल स्वीकारू

नारायणाचां देउळी दोनि घागरी करूनि चांपेलाच्या ठेवीलीया होतिया : तिया गोसावीं श्रीमुगुटावरी घेतलीया : वोतीलीया : तवं भोपां पूसीलें : “राउळो : एथ चांपेल होतें तें काइ केलें?” गोसावी म्हणीतलें : “एणे घेतलें :” म्हणौनि बोंबीएवरि’ श्रीकरीचे बोट ठेवीलें आणि बोंबीएहुनि’ चांपेल नीगाले : तेणे मागुती घागरी भरीलीया : तेयासि जालें : गांवीचेया लोकांसि जालें : आवघेयांसि आश्चर्य जालें :॥

नारायणाच्या देवळात दोन घागरी भरून चांपेलाचे तेल ठेवलेले होते. त्या श्री गोसावींनी श्रीमुकुटावर घेतल्या, ओतल्या. त्यांना भोप्याने विचारले. ” राऊळ, इथे चाप्याचे तेल होते ते काय केले?” त्यांना गोसावी म्हणाले, ” आम्ही घेतले.” आणि आपले बोट बोंबीवर ठेवले. तिथुन चाप्याचे तेल निघण्यास सुरू झाले. भोप्याने घागरी भरून घेतल्या. गावकऱ्यांनी देखील घागरी भरून घेतल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: