१४ कामाक्षा सूगरणी म्हणणे

एकू दीसू गावीचे माहाजन गोसावीयांपासि बसले होते : तवं गोसावीं श्रीकरेंकरूनि टाळि वाइली : आणि उभे राहीले : श्रीमुखीं आंगुळी घातली : माहाजनी पूसीलें : “राउळो : ऐसें काइ?” गोसावी म्हणीतलें : “काउरळीची कामाक्षा अळजपूरी वडे पूरीया तळीत होती : पूरी काढीतां पोळली : ते तोंडी आंगुळी सूदली :” मग माहाजनी तोचि दीसू तोचि मासू लीहुनि पाठवीलें : तवं कामाक्षा म्हणीतलें : “साच : हे तुम्हांपूढे कवणें सांघीतलें ?” ना हे श्रीचांगदेओराउळी सांघीतलें :” तीसि आश्चर्ये जालें : तिया म्हणीतलें : “ हो : ते दीसी गोसावी एथ होते :” माहाजना आश्चर्ये जालें : हे गोष्टि माहादाइसीं गोसावीयांपासि सांघीतली : ॥

ही लीळा द्वारावतीच्या लीळा पैकी एक आहे. लीळा चारित्रा च्या सर्व पोथ्यांमध्ये या लीळा आढळत नाही. या अज्ञात लीळा आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: