१५ श्रीप्रभू भेटि

माहादाइसांप्रति सर्वज्ञे म्हणीतलें : “रीधपुर प्रांतीं रीधपुरा आणि नांदिगावांमाझारि दीढा गाउवांचेनि माने खेड’ नावं गव्हाण : तेथ काणवां ब्राह्मणाचां ग्रहीं श्रीप्रभु गोसावीं गर्भी अवतारू स्वीकरिला : मातें नावं नेमाइसें : पितेयां नावं आनंतनाएकू : गोसावियांचेया मातेयापितेया बहूतें लेकरूवें जालीं : तीएं जीतीचि ना : मग निपटनेयांचे गोसावी जाले : मग तेहीं गुंडो ऐसें नावं ठेविलें : गोसावियांची मातापीता अपरोक्षं जालीं : मग मामेनि माउसीया वाढवीलें : मग वरीखां सातांपांचांमध्ये मुंजिबंधन जालें : मुंजिव्रत भुलि ते चाटेयांहीं सांगति : आणि उपाध्यांहीं सांघति : वरीखां बारांतेरांमध्ये संन्यासू स्वीकरिला : कमळारण्य गुरू : गोसावीयां नावं वीबुधारण्य : ऐसें नावं स्वीकरिलें : मग केसवापासिली मढीहुनि द्वारावतीए बीजें केलें : दुंडीराउळ” सरिसे होते” :

महदाईसाला सर्वज्ञ सांगतात. रिद्धपुर जवळ गव्हाण नामक गावी ब्राम्हणाच्या घरी श्रीप्रभूंनी अवतार घेतला. आईचे नाव नेमाईसा आणि पित्याचे नाव अनंतनायक. या जोडप्यास अनेक आपत्ये झाली परंतु ती जगली नाहीत. शेवटी उतरत्या वयात अपत्यप्राप्ती (गोसावी) झाली. तेंव्हा त्यांचे नाव गुंडो असे ठेवण्यात आले. पुढे माता पिता मृत्यू पावले. त्यांचा सांभाळ मामा आणि मावश्यांनी केला. मग सात पाच वर्षात त्यांची मुंज करण्यात आली. मुंजाविधी करतांना

स्रीप्रभु गोसावियांसि गोमतीएचां तीरी आसन जालें : पुढां दुंडीराउळ२ बैसले असति : दंडु रोविला : पुढां देवपटु देव मांडिले : स्रीचांगदेओराउळ गोसावीं बीदीगोदरीया झाडुनि तेथ बीजें केलें : स्रीमुगुटीं सुप : श्रीकरी खरांटा : गोमतीएमध्ये पुंजे नीक्षेपिले : स्रीप्रभूचां मुगुटीं सुप ठेविलें : वरि खरांटेयाचा घाओ दीधला : तेथ श्रीप्रभु परावर स्वीकरिलें : अवर अछादिले : पर प्रकटियें केलें : दुंडीराउळ खराटेनि हाणीतले : तेयां मंत्रजात वीदीत सीधि प्रकटिली : दंडु मोडिला : गोमतीए आंतु घातला : देव देवपटु सुपी भरूनि गोमतीएं आंतु नीक्षेपिले” : सुपें हाणीतलेयां तेयां वीद्या होति : खरांटेनि हाणीतलेयां मार्ग प्रगटति५ : मग स्रीप्रभू मागुते रीधपुरासि बीजें केलें :

नगरांआंतु पुडी करीति : बारवे अथवा देवाळां आरोगण करीति : परि झोळी धूआवेयाची प्रवृति नाहीं : ते आवघी अनरसेंकरूनि झोळी कुहीजली : ते फाटली : ते भिक्षा करितां अन खालि सांडे : आणि गोसावी तेथचि बैसोनि आरोगण करीति : लोकु म्हणे : “पुरुखांचां ठाई तूर्य अवस्था असे :” एक नीद्रास्थान नाहीं : म्हणौनि अनिएत” वासु म्हणीजे :”॥

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: