मग गोसावीयांची स्रीमूर्ति सावीयांचि संकीर्ण’ जाली : मग गोसावीयांचीया माता प्रधानातें वीनवीलें : “कुमरू सावीयां संकीर्षु जाला : तरि रामयात्रे पाठवीजे ना कां : तवं तेही म्हणीतलें : “आम्ही राजे : राजेयासि काइ केही जाणे असे? राजा प्रोहीतद्वारें क्रीया कीजे : ब्राह्मणातें पाठौनि : ते प्रोहीतद्वारें यात्रा करूनि येती :” तें गोसावीयांसि मानेचि ना : दिवसेंदिवस गोसावींची श्रीमूर्ती कृश झाली मग त्यांची आई प्रधानाला म्हणाली की आपला कुमार खूप कृश झाला आहे तेंव्हा आता तरी त्याला रामा यात्रेला पाठवा ना. तेव्हा प्रधान म्हणाला, आम्ही राजे आहोत. राजांना असे केंव्हाही आणि कुठेही जाता येते का? राजा हा पुरोहिताच्या द्वारे क्रिया करून घेतो. ब्राह्मणांना पाठवून ते पुरोहिता द्वारे यात्रा करून येतात. परंतु या प्रस्तावास गोसावी मान्य करिनात. मग गोसावीयांचिया माता म्हणीतलें : “ यासि रामयात्रेचा आग्रहो : तरि रामयात्रे पाठवीजे ना कां :” तवं तेणें म्हणीतलें : “ सेजां सींगणदेओ राज्य करीतु असे : गुजरां आणि जाधवां दंद लागले असे : ऐसांही जाणीतले होइल तरि अन्यासें दंद हातां येइल : मां कैसा पाठवावा ?” माता म्हणीतलें : सडीए आइतीसी पाठवावा : दो घाइं रजपुतांचीया परी : अनेत्र लोकु जाते तैसा हाही जाइल :”ऐसा गोसावीयांचीया माता रामयात्रे पाठवावेयाचा आग्रहों घेतला : तेव्हळि प्रधाने आइति केली : यावर गोसावींची आई म्हणाली की याचा जर राम यात्रेचा आग्रह आहे तर त्याला तुम्ही का पाठवत नाही. त्यावर प्रधान म्हणाला की शेजारी सिंघण देवाचे (देवगिरीचे यादव) राज्य आहे. आणि गुजर आणि यादव यांमध्ये द्वंद्व (भांडण/युद्ध) लागलेले आहे. असे असता या परिस्थितीत मी कुमारला तिकडे कसे पाठवावे? त्यावर आई म्हणाली की- सडा पाठवावा, सामान्य राजपुत्रांच्या सारखे अनेक लोक जातात तसा हादेखील जाईल. असा त्यांच्या आईने तीर्थयात्रेला पाठवण्याचा आग्रह घेतला तेव्हा प्रधानाने गोसावी यांना रामयात्रेला पाठवण्याची सर्व व्यवस्था केली. गोसावीयांसि दांडी : १ : डोळीकार : २ : हडपी : ३ : बारी : ४ : सागळीया : ५ : चवरधरू : ६ : भांडारी : ७ : वेचकरू : ८ : सुआरू : ९ : बडुवा : १० : ऐसे दाही सरिसे दीधले :आणि ऐसी कोठी भरिली : अवघी आइति केली : मग गोसावी बीजें करितां तीनि वेळ माळवधाआंतु गेले : तीनि वेळ कमळाराणीएतें अवळोकिलें : परि तेयां काहीं उपजे ना : गोसाविंना दांडी, डोळीकार, हडपी, बारी, सागळीया, चवरधरू, भांडारी, वेचकरू, सुआरू आणि बडुवा असे दहा जण सोबत दिले. तसेच सोबत कोठी भरून वस्तू दिल्या. प्रवासाची सर्व व्यवस्था केली. गोसावींनी प्रस्थान करता तीन वेळ माळवदात (घरात) गेले. तिन्ही वेळी कमळा राणीस अवलोकिले. परंतु तिला काही समजले नाही. मग बीजें केलें : तीनि वांकद्वारेंवरि माता बोळवीत आली : तीएं तेथ राहावीली : मग बीजें केलें : आपण प्रधानु येक° पेणे बोळवीत आला : पाइकपरिवारू बहुतु सरिसा : तो तेथ राहावीला : दूस राहावीलें : दुसरां पेणां दांडी राहाविली : कमळाआउसांतें आणावेया म्हणौनि तीसरीये पेणां एकांतें राहाविलें : गोसावी आपुला देसु सांडीति तवंवहीं अवघेयांसि एओं दीधलें : मग गोसावी पेणेप्रति एकएक राहावीत गेले : हडपु आणि सागळीया ते दोघे न संडितीचि : मग हडपीयाचेया घोडयावरि आरोहण करूनि बीजें करीति : रात्रीं नीद्रा करीति : ते दोन्ही दोहींकडे : माझारि गोसावी : ऐसां एक दीसु अवघे अळंकार प्रत्येजुनि : दोन्ही नीदसुरे सांडुनि२ : एक वस्त्र वेढिलें : एक प्रावरण केलें : ऐसें गोसावीं रीधपुरा बीजें केलें : मग ते रडति : दुख करीति : चहुंकडे पाहाति : मासा ऐसें चडफडीति : मग ते रामुवन्हीं गेले : मग आपुलेया गावां गेले : ।। सर्व ज्ञान ना सर्व जण निरोप देण्यासाठी आले आई ही तीन द्वार सोबत आली नंतर तिथेच थांबली त्यानंतर प्रधान बरेच पुढे आली नंतर ते ही देखील थांबले त्यासोबत बाईक देखील काही अंतरानंतर थांबले. जोपर्यंत आपला प्रदेश आहे तोपर्यंत गोसावींनी लोकांना आपल्या सोबत येऊ दिले. नंतर मात्र त्यांना तेथेच थांबवले. असे करत करत शेवटी सर्व लोक थांबले व नंतर गोसावी आणि त्यांचे दहा जण सोबती हे पुढे प्रवासास निघाले. पुढील प्रवासात दर मुक्काम गोसावींनी एकेका व्यक्तींना प्रधान कडे निरोपासाठी परत पाठवले. अशाप्रकारे त्यांच्या सोबतची एक-एक मंडळी कमी होत गेली शेवटी सागळीया आणि हडपे हे दोघेच गोसावींसोबत शिल्लक राहिले. त्यांनी मात्र गोसावींची साथ सोडली नाही. दोघा व्यक्तींसोबत पुढे बरेच दिवस गोसावींनी घोड्यावर प्रवास केला एके रात्री मात्र, सर्व निजले असता गोसावींनी सर्व अलंकार त्यजिले आणि ह्या दोघा व्यक्तींना झोपेत तसेच ठेवून केवळ अंगावरच्या दोन वस्त्रानिशी पुढे प्रवास सुरु केला. दुसऱ्या दिवशी गोसावी दिसत नाही हे बघून सोबतचे दोघेजण दुःखी झाले. खूप रडले. त्यांनी सगळीकडे शोध केला. दोघेही जळाविन माशासारखे तळमळू लागले. परंतु काहीही ठावठिकाणा लागला नाही. शेवटी ते रामुवन्हि ला गेले. पुढे नंतर स्वतःच्या गावी परतले. माहादाइसी पुसिलें : “जी जी : तेयां काइ जालें ?” सर्वतें म्हणीतलें : “बाइ : तेयांसि महंत स्ररासि जाली :”। महदाइसा ने विचारले की त्यांचे नंतर काय झाले त्यावर सर्वज्ञ म्हणाले की बाई त्यांना महांत स्रराशी झाली. मग गोसावी उतरील दारवंठेनिः सवळेचीया पाहारा दीसा”: परमेश्वरपुरासि आले : नगराआंतु बीजें केलें : रांधवन हाटी श्रीप्रभूसी दरीसन जालें : पुर्वपसीम दोन्ही वोळी : उतरदखीण दीघडीया : पसिमील वोळि पुर्वाभिमुख आमचे गोसावी : पुर्वीली वोळि पसिमामुख श्रीप्रभू : अर्धवस्त्र वेढिले असे : अर्ध उतरासंगें प्रावरण केले असे : मोकळा कासोटा : नाभिचुंबीत खाड : मोकळे केसकळाप : डावा श्रीनेत्रु अर्धोन्मीलितु५ : डावीये श्रीकरिची आंगुळी वांकट: आमचां गोसावीं श्रीप्रभूतें देखौनि कायाप्रणीत केलें : मग एके दिवशी, गोसावी उत्तरेकडील द्वारातून परमेश्वरपुरास म्हणजेच रिद्धपूरास आले. नगरात प्रवेश केला. आणि जिथे रांधवण हाटी (स्वयंपाक) चालू होती तेथे त्यांना श्रीप्रभूंचे दर्शन झाले. गोसावी पूर्वेकडे मुख करून उभे होते आणि श्रीप्रभु पश्चिमेकडे. श्री प्रभूंनी अर्धवस्त्र वेढलेले होते आणि अर्धे उत्तरिय वस्त्र नेसले होते. मोकळा कासोटा, नाभीपर्यंत पोचलेली दाढी, मोकळे केस, डावे श्रीनेत्र (डोळा) अर्धोन्मीलित, डाव्या श्रीकराची (हाताची) अंगुळी वांकट होती. त्यांना बघून गोसावींनी श्रीप्रभुंना कायाप्रणाम केला आणि आपणेयां आपण क्षेमाळींगन दीधलें : आणि आमचेया गोसावीयांतें देखौनि स्रीप्रभू म्हणीतलें : “ऐया माझा जाला म्हणे : आतां होये म्हणे :” श्रीप्रभूचां एकी श्रीकरी सेंगळे : एकी श्रीकरी बुडडे : चावीति थुकीति : हास्य करीति : गगनाची वास पाहाति : आमचे गोसावी श्रीप्रभूची लीळा अवळोकीति :श्रीप्रभू आमचेयां गोसावीयांची वास पाहाति : आणि गोसावी श्रीमुगुटु खोलवीति : श्रीप्रभूचां श्रीकरी सेंगळे बुडडें होतें : सेंगुळे आरोगुं सरलें होतें : बुड. आरोगावें होतें : तें श्रीप्रभू म्हणीतलें : आरे : घे घे म्हणे : घे ना म्हणे: आरे घे घे२ : ” म्हणौनि प्रसादु करुनि दीधलें : आमचां गोसावी माहाप्रसादु म्हणौनि कायाप्रणीत करूनि दोहीं श्रीकरी धरूनि नमस्करिलें : आणि श्रीप्रभू आमचेयां गोसावीयांचेया श्रीमुखावरि श्रीकरू ठेविला : तेथ आमचां गोसावीं ज्ञान-शक्ति स्वीकरिली : परावर-शक्ति स्वीकरिली : आमचां गोसावीं पूर्वीलेनि दारवंठेनि बीजें केलें : श्रीप्रभू माहाद्वारवरि बोळवीत आले : तेयां दीसी तळेगावीं वस्ति जाली: ज्ञानाचे कार्य ऐसें : जें ज्ञानापाठी वैराग्य उपजे : मग गोसावीं तेहीं स्वीकरिलें: आणि स्वतःहून त्यांना क्षेमालिंगन दिले. गोसाविंना बघून श्री प्रभू म्हणाले की हा आता माझा झाला. आणि श्री प्रभूंनी एका हाती सेंगळे आणि एका हाती बुड्डे घेतले. ते चावले आणि थुंकले आणि त्यानंतर हास्य करते झाले. गगणाकडे दृष्टी लावून बसले आणि ही सर्व लीळा गोसावी बघत असतात. श्रीप्रभु गीसावींना घे घे म्हणत तो प्रसाद दिला आणि गोसावींनी देखील तो महाप्रसाद म्हणून स्वीकारला. मग श्रीप्रभूंनी आपला श्रीकर (हात) गोसावींच्या श्रीमुखावर ठेवला. याद्वारे श्रीगोसावींनी श्रीप्रभूंकडून ज्ञानशक्ती आणि पराशक्ती स्वीकारली. यानंतर गोसावींनी पूर्वेकडील द्वाराकडून प्रयाण केले. त्यांची बोळवण करण्याकरिता श्रीप्रभु महाद्वारापर्यंत आले. त्या दिवशी गोसावींचा तळेगावी मुक्काम झाला. ज्ञानाचा कार्य असे असते की त्यापाठी वैराग्य उपजते. त्याचाही स्वीकार गोसावींनी केला.