गोसावीं दादोसांतें म्हणीतलें : “माहात्मे हो : तुम्हीं श्रीप्रभूचेया दरीसना कां जा?” तवं दादोसी म्हणीतले : “ना जी : ते आमचे परमगुरू असति म्हणौनि जाओं :” सर्वज्ञ म्हणीतलें : “ ते वानरेयांचे परमगुरू : तुमचे परमगुरू ते कांतीयेसि असति :” माहादाइसी पूसिलें : “ते कैसे जी?” यावरि हे गोष्टि सांघीतली : सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइ : हे कांतीयेसि गेले होतें : यांसि एक कटिप्रदेसी सुडा :: एकु श्रीमुगुटावरि सुडा : ऐसें दुर्गाचेनि परीसरे जात होतें : तवं द्वारावतीकारां श्रीचांगदेवोराउळां गोसावीयांचे अनुग्रहीत : उधळीनाथ : ते तेथ राजगुरू होउनि वर्तत असति : ते रायाचे गुरू : ते उपरीयेवरि बैसले असति : तेही यांतें उपरीयेवरौनि देखिलें : मग आपुलेयां सीक्षांतें बोलावू पाठविलें : सीक्ष आले : तेही यातें वीनवीलें : ‘जी जी : रायाचे गुरू : उधळीनाथ : तेही तुमतें बोलावू पाठविले असे जी : ‘ यांसि तेथ जावेयाची प्रवृति : मां तेयांची वीनवणी स्वीकरिली : मग हे तेथ गेलें : तवं ते डोल्हारेयावरि बसले असति : यातें एतां देखौनि तेही म्हणीतलें : ‘पुरूखा : ऐसा पीडु कां उपेखिला बापेया?’ म्हणौनि तेथौनीचि आपुलेनि सामर्थ्य वीद्या प्रभौं आदरिली : परि प्रभवे ना : मग पोटी म्हणीतलें : ‘ऐया रे : पुरूखु कैसा हटीया असे :’ मग ते डोल्हारेयावरौनि उतरले : खालि बैसले : यासि आसन घातले : हे जाउनि तेथ बैसलें : तवं केसकळाप तुटले : गवतकाडीया कुसळें रूतली : श्रीमुर्ती सर्वांगी कांटेयांचे वोरखंड : तेथ असुधबींदु वाळले : ते माणीकें झळाळीतें ऐसी दीसताति : ऐसी श्रीमूर्ति देखौनि उधळीनाथें आपुलेनि हातें कांटेकुसळे वेंचुनि : वीरगंठि सोडुनिः नखवरि श्रीमुगुटु वींचरूनि : मागुती वीरगंठि घातली : मां धूतवस्त्रे’ तीमुनि सर्वांगीचे असुधबींदु पुसिले : मग यातें हात जोडुनि वीनवीलें : ‘जी जी२ : मातें वएस्तंबनी नावें वीद्या असे : ते स्वीकरिजो जी : तीएसि वळीतपळीत नैए : तीएसि सहश्रु वरीखें३ आउक्ष : ते गोसावीं स्वीकरावी जी :’ तेव्हळि श्रीमुगुटाचेनि अनुकारे करूनि मानिलें : मग वीद्या स्वीकरिली : एतुकेनि ते वीद्या प्रभवली:” मग माहादाइसीं गोसावीयांतें पुसिलें : “जी जी : गोसावीं तेयांपासौनि वीद्या स्वीकरिली : तरि५ तेयांसि गोसावी काइ दीधलें१६ जी?” सर्वतें म्हणीतलें : “बाइ : तेयांची वीद्या अपरीपुर्ण होती : ते एथौनि स्वीकरूनि परीपूर्ण केली :”।
एकदा श्रीचक्रधर स्वामी यांनी दादासाना विचारले की माहात्मा हो तुम्ही श्री गोविंद प्रभुच्या दर्शनाला का जातात? तेव्हा दादोसा त्याना म्हणतात की ते आमचे परम गुरु आहेत म्हणुन आम्ही जातो. यावर सर्वज्ञ म्हणजे चक्रधर स्वामी म्हणतात की ते तर वानरेयाचे म्हणजे भटोबासाचे परम गुरु आहेत. तुमचे परम गुरु तर कांतिय म्हणजे कटोल या ठिकानी आहेत. ते तुमचे परम गुरु कसे काय?
यावर महदाईसा त्याना विचारले – “हे कसे काय?” या वर सर्वज्ञानी एक गोष्ट सांगीतली सर्वज्ञ म्हणाले महदाईसा हे जेव्हा कटोलला गेले होते. हे कांतिय गेले होते. त्यावेळेस हे म्हणजे स्व:ता श्री चक्रधर स्वामी तेव्हा चक्रधर स्वामीच्या कमरे भवती ऐक वस्त्र होते आणि श्री मुकुटावर म्हणजे डोक्यावर ऐक वस्त्र होते. तेव्हा किल्ल्याच्या परिसरात जात असताना तिथे द्वारावरती श्री चांगदेव रावु याचे अनुग्रहीत म्हणजे शिक्ष श्री उधळीनाथ तेथे राजगुरु होते. ते राजाचे गुरु होते आणि ते वरच्या माढी वरती बसले होते.घरच्या वरच्या मजल्यावर बसलेले होते. त्यानी वरती माढी वरुन श्री चक्रधर स्वामीना जाताना पहिले आणि त्यानी आपला शिक्षाला पठवले आणि श्री चक्रधर स्वामीना बोलवुन आणण्यास सांगितले. शिक्ष आला आणि त्यानी श्री चक्रधर स्वामीना विनावले की राजाचे जे गुरु आहेत श्री उधळीनाथ त्यानी तुम्हाला बोलावण्यासाठी पाठवलेले आहे. तेव्हा श्री चक्रधर स्वामीना तेथे जाण्याची प्रवुती होती त्यमुळे त्यानी ती विंनती स्विकारली
हे तिथे गेले तेव्हा उधळीनाथ बंगाईवर म्हणजे झोक्यावर बसले होते याना बघुन ते म्हणाले की पुरुखा म्हणजे पुरुशा असा पिड का उपेशीला? म्हणजे शरीराची अशी अवहेलना का करता तुम्ही म्हणुन त्यानी आपल्या सामर्थाने विद्या जी आहे ती श्री चक्रधर स्वामीना आदरली परतु तिचा प्रभाव पडेना मग म्हणाले की अरे हा पुरुष कसा हट्टी आहे . मग ते झोपाळ्याहुन उतरले आणि खाली बसले आणि श्री चक्रधर स्वामीसाठी पण ऐक आसन घातले चक्रधर स्वामी ही त्यावर जावुन बसले. तेव्हा केशक्राप तुटलेले होते त्यात गवताच्या काड्या कुसळे सगळे रुतलेले होते. श्री मुर्तीच्या सर्व अंगावर काट्याचे ओरखडे होते आणि तेथे असुद बिंदु म्हणजे वाळलेल्या रक्ताचे थेंब देखिल होते आणि ते जशे मानिक असतात तसे दिसत होते अशी श्रीमुर्ती पाहुन मग उधळीनाथानी आपल्या स्व:तच्या हातानी त्याचे काटे कुसळ वेचुन काढले त्याच्या केसानची विरगठी सोडली हाताच्या बोटानी नखानी श्री मुकुट विचरुन काढले म्हणजे चक्रधर स्वामीचे केस विचरले परत ते सर्व केस व्यवस्तित करुन परत विर कठी घातली आणि मग शुभ्र दुत वस्तानी त्याच्या सर्वागीचे जे रक्ताचे थेब होते असुद बिंदु ते पुसले.
मग त्यानी श्री चक्रेधर स्वामीना विनवले की जी जी माते वय स्तभीनी विद्या असत म्हणजे माझा कडे वयस्तभीनी नावाची विद्या आहे तिचा तुम्ही स्विकार करावा तिच्यामुळे वळितपळित येत नाही. वळितपळित म्हणजे माणुस वयस्कर होत नाही चेहर्यावर सुरकुत्या येत नाही आणि ही विद्या जार्णाला सहस्त्र वर्ष आयुक्ष प्राप्त होत ती गोसाविनी स्विकारावी तेव्हा आपले श्रीमुकुट हालवुन माण्यता दिली आणि त्याचाकडुन ती विद्या स्विकारली ती विद्या स्विकारल्या वर लगेच ती प्रभावली म्हणजे तिचा प्रभाव सुरु झाला आणि हे सर्व सांगत असताना महदाईसा विचारतात की तुम्ही त्याचा पासुन जी विद्या स्विकारली तर तुम्ही त्याना काय दिले? त्याची जी विद्या होती ती अधुरी होती ती स्विकारुन मी त्याला परीपुर्ण केले