२६ अंध्रदेसी तेलिकारा भेटि

सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइ : हे अंध्रदेसीं होतें : एका गावां गेलें : तेलिकार एक सीवभगत : ते पाहातपटीं उठीति : झुंझुरकां गंगेसि जाति : गुळुळा करीति : पाए धूति : टीळा लावीति : लींगपुजा करीति : धूपार्ती करीति : मग आपुला व्यापारू करूं लागति :

एकु दी पाहातपटींचि उठीले : नदी गेले : तेयाची बाइल पासवडी हातींपाइं लाउनि नीजैली होती : गोसावीं बीजें केलें : पासवडी उंच केली : तेयांचीए अस्त्रीएसवें पाठिसी गोसावीं पहुडु स्वीकरिला : तीया म्हणीतलें : ‘काइ मागुता आलासि? रात्रि काइ गा वडीलि असे ?’ सर्वतें म्हणीतले : ‘हे उगेंचि :’ तीयां म्हणीतलें : ‘कां गा बोलसि ना ?’ तवं तीचिया आंगा आंग लागलें : सकुमार : हीवं ऐसी श्रीमुर्ति लागली : तीचीये पाठिचेया प्रमाणुसि संबंधू दीधला : आणि ते गजबजुनि पासवडी सांडूनि उभी राहिली : ‘हें काइ ओ आइ ? माझीये पाठिसी कोण नेणों दादुला नीजैला असे : ‘ऐसें म्हणौनि उठिली : सेजासाइला : लोकु मीनला : दारें कोणे भरली : एकें तेयांपुढे सांघों गेली : ‘आगा : तुं काइ बसला आहासि? तुझीए बाइलेचीए पाठिसी कोणु नेणों दादुला निजैला आहे :’ तेणें म्हणीतलें : ‘हो गा हो : तुम्हीं कां गा बोबातसा ? नीजों देया :’ मग तेणे हातपाए धूतले : गुळुळा केला : तेया मलिनाथाची भक्ति : तेणें जैसी पुजा करावी तैसी करीतुचि होता : पुजा केली’ : पुजा करूनि आला : काखें काढिली सुरी : सरिसीं माणुसें : तवं आंतुबाहीरि लोकु दाटला असे : गोसावीं श्रीमुगुटीं° श्रीचरणीं पासवडी लाउनि पहुडु स्वीकरिला असे : मग तेणें श्रीमुगुटावरील पासवडी ऐसी धरूनि आसुडिली : ‘कवणु गा तुं?’ तवं श्रीमुख देखिलें : हाति, खर्ग गळौनि गेले ११ : आणि म्हणीतलें : ‘ऐया लींगा : आजि लींगभेदु जाला होता : आरे : तुम्हीं अवघी परतीं जा : माझेया घरा आजि माझा देओ आला : माझेया घरा माझा सोमनाथू आला : माझेया घरा माझा मलिनाथू आला : आजि माझें पुजितें लींग आले :’ मग तेणें अस्त्रीएतें म्हणीतलें : ‘उठि उठि : ए आरूती : गोसावीयांचेया श्रीचरणां लाग :’ मग ते आली : गोसावीयांसि दंडवत घातलें : मग तेणें तीएतें म्हणीतलें : ‘आजि तुं जेतुकें पाक करूं जाणसि तेतुकेंहीं करि :’ ऐसें म्हणौनि तो पुजाद्रव्ये आणुं हाटासि गेला ः तवं हाटीं सरें देखिली : तीएं घेतली : पुजाद्रव्ये घेतली : सरें आणिली : गोसावीयांसि सरें वोळगविली : सर्वतें म्हणीतलें : “बाइ : तैं सरांचे दीस३ : मुठीएसणी सरें की!” म्हणौनि ऐसी मुठि करूनि श्रीकराचा अनुकारू दाखवीला : गोसावीं दोनिच्यारि आरोगिली : मग गोसावीं गुळुळा केला : वीडा ओळगविला : मग गोसावीयांसि वोलणी दीधली : दोघीं गोसावीयांसि मर्दना दीधली : ‘आमचा सोमनाथू :’ म्हणौनि हरीखैजति : मग मर्दनामादने जालें : मग धूतली वस्त्रे सलदिची काढिली : गोसावीयांसि ओळगविली : गोसावीयांसि आसन रचिलें : गोसावी आसनीं उपवीष्ट जाले : मग गोसावीयांसि बरवी पुजा केली :” बाइसी म्हणीतलें :

बाबा : तो तेली माणुसु पुजा करूं केवि जाणे?” सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइ : तो संप्रदाएकु : पुजा करूं जाणे :

मग ताट केलें : ताटी बहुत ओळगविलें : आरोगण जाली : गुळुळा जाला : वीडा ओळगविला : मग बाजसुपवती झाडिली : बाजेसुपवतीएवरि पहुडु जाला : मग तीएं आपण दोघे जेउं बैसली : तेयाचि ताटी प्रसादु घेतला : घेउनि तोखतेंतोखतें जेवीति : ‘ब्रम्हादीकांजे वस्तु दूर्लभ ते आजि आम्हांसि जालें:’ ऐसें सुख अन्मोदितें दोघे जेविली : आंचवली : मग दुधातुपा वाटी भरिली : मग गोसावीयांचीए सेवे प्रव्रतली : श्रीचरण प्रक्षाळिलें : मग एकु श्रीचरण एके घेतला : एकु श्रीचरण एके घेतला : मग चरणसह्वान केलें : सागळ५ भरूनि उसीसेयाकडे खुंटीयेसि घातली : परि सांघों वीसरली : मग आपण तेथचि श्रीचरणतळी आंथरूनि नीजैली : गोसावीयांसि मध्याने एकी रात्री तीखेची प्रवृति जाली : मग पाहानपटींचि उठौनि गोसावी तेयांची वस्त्रे ठेविली : आपुली वस्त्रे घेतली : मग तुंगभद्रेसि बीजें केलें : तुंगभद्रा पुरें जाति असे : माळथोंबावरौनि आंजुळि उदकपान करूं बैसले : तवं दरडि खचली : तेणें थोंब खचलें१८ : आणि श्रीमूर्ती झळंवली : गोसावीं तेथचि झुंबड धरूनि उदकाआंतु बीजें केलें : गोसावी ऐलाडि बीजें करीति : पैलाडि बीजें करीति : मध्ये बीजें करीति : ऐसां दीसु नीगेतवं गोसावीं उदकाआंतु बीजें केलें : तवं एकी गाविची गोवळरूवें बोबाइली : ‘माणुस रे माणुस पुरें आलें :’ म्हणौनि अवघा लोकु पाहावेया आला२० : सहजें श्रीमूर्ति जेथ थडिये लागली तेथ बीजें केलें : श्रीमुर्ति झाडुनि तेयांकडे धाव घेतली : सर्वतें म्हणीतलें : “बाइ : तें तैसीचि प्रवृति होती : जें तान्हैलेयांहीं पाणी पीओं न मगिजे : आतां ऐसी प्रवृति : जें बळवंडेयां करवीत असिजे : घ्या घ्या बापें हो : वेगु करा:

हे गोष्टि गोसावीं पंचाळेस्वरी गुंफा करितां सांघीतली२: ।।

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: