२८ जुतक्रीडा

कव्हणी एकु गावू : तेथ गोसावीं बीजें केलें : गोसावीयांसि कटिप्रदेसी सुडा : श्रीमुगुटीं सुडा : ऐसें गोसावीं जुआंठेयासि बीजें केलें : तवं ते कव्हणीचि गोसावीयांची वास न पाहाति : सर्वतें म्हणीतलें : “धुरे एकी पवाडु आति’?” आणि तेहीं ऐसें पाहिले तेही म्हणीतलें : “एइजो जी : एइजो जी :” म्हणौनि अवघे परते सरले : मध्ये पवाडु केला : बैसों घातलें : गोसावीयांसि आसन जालें : चौदानी जुं पडत असे : कडु जागरू’ : नादु : वेतीया : तीही गोसावीयांतें वीनवीलें : “घेइजो जी एक दान :” गोसावीं एक दान घेतलें : पाउगीयापासौनि फेरू घेतला : गोसावी पुंजीएचे कवडे श्रीकरी घेउनि ऐसें चोळिलें : तीही म्हणीतलें : “गोसावी जुआंरी होती!” खेळों लागले : अवघेयांसि जो पाणी पीओं सूए तेणें गोसावीयांसि उदक ओळगविलें : गोसावीं उदक स्वीकरिलें : जो अवघेयांसि वीडा दे तेणें गोसावीयांसि वीडा ओळगविला : गोसावीं वीडा स्वीकरिला : मग गोसावीं वीळुवरि खेळु स्वीकरिला : गोसावीं जूं वीळुवरि खेळीनले : बहुत मुंजीतलें : मा कुरूंगे कुरूंगे कवडे नीवडीले: एर कवडे मग जीतुलाही जीणा जींकिला तेतुलाही गोसावी दानासि करीति : एक कवडे तांबोळ दे तेयासि देति : एक पाणी पाजी तेयासि देति : गंधवादी धुपी : मागतेयांसि देति : एकासि पवींत देति : मा पीवळे कुरूंगे कुरूंगे कवडे श्रीकरीं ऐसा पसाभरि घेउनि दोंदेंसी धरूनि गोसावी रांधवणहाटा : उभीया हाटवटीया बीजें करीति : मां सोवणी : दुसी : वाणीए भूसारी : तेली : तांबोळी : आपुलाले व्यापार करीत होते : तेयां श्रीमुर्ति अवळोकितां तेयांचे व्यापार तैसेचि राहिले : गोसावीयांसि बीजें करितां श्रीमुर्ति दीसेतवं पाहातचि राहिले : ऐसी गोसावी अवघी हाटवटी वेधली : दृष्टि फांके तवं पाहातेंचि असति : ऐसें गोसावी रांधवणहाटें बीजें करीति : मां गोसावी एकाधी एकी रांधवणीतें म्हणति : : कवडा अंन जोडे ओ?” मग ते म्हणे : “एइजो जी : एइजो जी : भीतरि बीजें कीजो जी :” मग गोसावी भीतरि बीजें करीति म्हणौनि तीया बैसों घालीति : मां पसाभरि कवडे श्रीदोंदेसी धरिले असति : ते ऐसे टाकुनि माझघरी घालीति : मग आसनीं बैसति : मा तीयें श्रीचरण प्रक्षाळीति : ओलणी देति : मां मर्दनामादने होए : मग आपुलीं वस्त्रे वोळगवीति : चंदन ओळगवीति : लल्हाटी चंदनाचा आडा रेखीति : पुजा होए : मग उंचा मोलाचे ताट करीति : मग गोसावीयांसि आरोगण होए : गुळुळा होए : सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइ : ते आरोगण कवडेयासारिखी नव्हे : ते अनुरागार खी होए : परत्रबुधी आरोगण देति३ : ” मग गोसावी आरोगण करीतां तया अन्नासि रू अमुकें अमुकेयासि पुरलें : अमुकेयासि अमुकें न पुरेचि : ऐसें रूप करीति : ते से सुख होए४ : वीडा देति : मग बाजसुपवती आंथुरति : झाडीति : मा गो पहुडु स्वीकरति : चरणसह्वान करीति : ते दीसी तेयांसि वीकिरा” थोरू । उदीयांचि गोसावी आपुली वस्त्रे वेढीति : तेयांची वस्त्रे ठेवीति : नावेक है में देती : ओतपळीया पडति तवं हे तेथ नीजलेंचि असे : तवं ते जुआरी याची वाट भाट : वीदावंत म्हणति : ‘हां गा कालिची धुर आझुइं नैए? कालिचा माहादानि नैए?’ ऐसी अवघींचि याची वाट पाहाति : मग गोसावी नैकडे जाति : प्रस्रय सोत्रा आच्मन करीति : हातपाए प्रक्षाळीति : गुळुळा करूनि तेथ बीजें करीति खेळति : जींकति : कुरूंगे कुरूंगे कवडे श्रीदोंदेसी धरीति : एर अवघे गोसावं देति : मां तीए दीसी आणीकी रांधवणीचेया घरा बीजें करीति : तीया यां। करीति : तवं तीएं अवघी याची वाट पाहाति : म्हणति : ‘कालिची धुर आझुइं नए ?’ मागुतें म्हणति : ‘कालिचा माहादानि आझुइं नए ?’ ऐसें दोहीं ओळी जेतुकीं रांधवण घरे तेतुकेयां घरा एककु दी आरोगण होए : तेतुके दी अवस्थान जालें : ऐसेया आवघेया रांधवणहाटासि संबंधु दीधला :” ।।.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: