३३ डांकरामों व्याघ्रवीद्रावण

शेअर करा

: गोसावीं’ डांकरामी बीजें केलें : गावां नावं डाक्रामु : देवते नावं भीवेस्वरू : तेया गावां गोसावीं बीजें केलें : गोसावीयांसि पाणिपात्र जालें : आरोगण जाली : मग गोसावी वीळिचां वेळी पहुड्डु स्वीकरावेया’ देउळासि बीजें करीत होते : तवं गांविचे लोक पारी बसले होते : तेही म्हणीतलें : “देव’ हो : या देउळां नको जाओं : एथु वाघु एत असे :” गोसावीं आगाधचक्रवती : गोसावी आइकिलें म्हणौनि येवं मागूतें पाहुनि बीजें केलेंचि : गोसावीयांसि चौकी आसन जालें : पहुडु जाला : तवं मध्याने एकी रात्री वाघु आला : तेणें हाक दीधली : गोसावीं सींहनादु केला : तो पौळि उडौनि गेला : तें रान सांडौनि पळाला : गोसावीयांसि पहुडु जाला : उपहुडु जाला : तवं उदीयांसीचि गांवीचा लोकु टाळ : घोळ : काहाळा : कांसौळी : मादळ : वाजवीत : हाका बोंबा देतु आला : वाद्यांत्रे वाजवीतु : देवतेसि पुजा करावेया आला : नीच तेयांचा बोभाटु आइकौनि तो नीघे : ते दीसी काहीं नीगतां देखतीचि ना : मग म्हणों लागले : “कालि जे देव आले : तेयांचेया आविसावरि बैसला असैल : म्हणौनि न नीगे:” ऐसे भीतभीत दारवठेवरि आले : तवं गोसावीयांसि चौकी आसन असे : “आरे : इस्वरपुरूख रे :” ऐसें म्हणौनि अवघे साउमे भीतरि आले : दंडवतें घातली : श्रीचरणां लागले : मग यातें पुसिलें : “जी जी : येथ वाघु आला होता की ?’ “आला होता: “जी जी तरि तो कैसेनि ” गेला?” सर्वतें म्हणीतलें : “यातें देखिलें : तेणे हाक दीधली : आणि एथौनि सींहनादु केला : तो हे पौळि उडौनि पळाला : ते हे नव्हे पौळि पडली असे : तो हे रान सांडौनि पळाला : तो आतां एथ नैए हो :” गोसावी म्हणीतलें : “बाइ : तीए दीउनि तें स्थान नीरउपद्रव वसतें जालें : ।


शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: