shri chakradhar swami

३५ पंचकुळ आचार्या ग्रहोनीवृति

गोसावी वीहरणस्थाना बीजें करिताति : दखिणेस्वराकडे : तवं सारस्वति भटी गोसावीयांतें देखिलें : आणि आड पालौ करौनि गेले : तवं बाइसी देखिलें : आणि म्हणीतलें : “हां बाबा : हा ब्राम्हणु : मागां बाबाचेया दरीसनासि ए : दंडवत करी : श्रीचरणां लागे : आतां बाबातें देखौनि आड पालउ करूनि गेला : हे काइ बाबा ?” सर्वज्ञ म्हणीतलें : “तेयांकारणे म्हेळीचेयापस्य सीक्षाचा अभिमानु थोरू :” मग यावरि पंचकौळ आचार्याची गोष्ट सांघीतली :”पंचकौळ आचार्या एकु : तो पांचे कुळी आचार्या : तेयाचा सीक्ष तो एकें आचारीएं चाळविला : तेणें अभिमानें तेयांसि तेणें वीखप्रळयो केला : तेया पापास्तव ग्रहो जाला : जाउनि वेव्हारेया एकाचा पुत्रु : तेयाचां आंगीं संचरला : अवघयां ग्रहोंचा मुक्ष नाएकु : तो खांबी सांकळी आळिला असे : गांवोगांविचे गुणीए : जाणे : मंत्रवादी जे एति : तो तेयांतें म्हणे : ‘एणे मंत्रे : या झाडनीयां तुं मातें धाडिसी : एणे मंत्रे : या झाडनीयां मी जाइन : एणें वोखदें मातें धाडिसी:’ आणि तो हात झाडुनि जाए : ऐसा तो काइसेनि कोण्हाचेनीही न वचे : मग एक दीसु गोसावीं पाणीपात्रासि बीजें केलें : पाणीपात्र जालें : मां तेयांचेया दाराआड पन्हीवा होता : तो ठाओवरि गोसावीं बीजें केलें : पहीवा वोलाडीतचि नोलांडीतीचि : तो खांबी आळिला होता : तेणें यातें देखिलें : आणि म्हणीतलें : आगा : मातें सोडा कां गा : मां मी पैला गोसावीयांपाठी जाइन : तेही म्हणीतलें : “आरे : हा कहीं बोले ना : तो आतां बोलतु असे : तरि यातें सोडा ना कां : हा मातें सोडा ऐसें कहींचि न म्हणे :” मग तीहीं सोडिला : आणि तैसाचि गोसावीयांसरिसा नीगाला : सवें त्याचे बापभाउ : चुलते : माणुसांची मांदी : पुढे पुढे गोसावी जाति : गोसावीयांमागें तो जाए : तेयामागें तेयाचा बाप : भाउ : चुलते : तेयामागें गांविची हाउळि : ऐसे गोसावी नइसि बीजें केलें : सीळेवरि श्रीचरणोदक घातलें : मग श्रीकरिचे पाणीपात्र घातलें : गोसावीयांसि आसन जालें : आरोगण करिताति : तवं ते आले : गोसावीयां तेणें उचीष्ट प्रसादु मागीतला : “जी जी : मज ताटप्रसादु देयावा जी :” सर्वज्ञ म्हणीतले “तुं कवणुं?” “जी जी : तें गोसावी जाणत असति की :” सर्वतें म्हणीतलें : “ एथौनि ” जाणीजत असिजे पां : तें तैसेंचि : परि एही अवघां जाणावें की :” म्हणौनि ऐमा श्रीका तेयांकडे दाविला : मग तेणे अवघे गोसावीयांपुढे सांघीतलें : “जी जी : मी पंचकुळ आचार्या जी : माझे सीक्ष आणिकां आचार्यापासि गेले जी : तेयांसि मीयां अभिमाने वीखप्रळयो केला : तेया पापास्तव मी ग्रहो जालां जी : अवघेयां ग्रहोचा मुभ नाएकु : तो मी या वेव्हारेयाचेया पुत्रासि लागलां : गांवोगांविचे गुणिए : जाणे : जोइमी : मंत्रवादी : मातें फेडावया एति : तेयांतें मी म्हणे : ‘एणे मंत्र तुं मातें फेडिसी’ : ते मी आधीचि म्हणौनि जाए : एतुकेनि ते हात झाडुनि जाति जी : गोसावी जरि मज प्रसादु देती तरि मी या ग्रहत्वापासौनि मुंचैन जी : आणि हा प्राणीया या दुखापासौनि मुचैल जी ” सर्वज्ञ म्हणीतलें : “तो एथिचीए दृष्टीसमोर न राहे की :” ” ना जी : मी असकयां न ग्रहेयांसि मुक्ष नाएकु जी :” मग गोसावीं वीनवणी स्वीकरिली : गोसावीयांसि आरोगण जाली : गोसावी तेथौनि उठीले : परतें सरौनि गुरूळा केला : उदक स्वीकरिलें : उदकासि वीनयोगु केला’ : आणि तेणें बुडि सीतें उरली होती : तो एउनि ताटप्रसादु घेतला : सर्वतें म्हणीतलें : “एयातें धरा गा : एहवीं आतां हा पडैल :” “ना जी : जैसा आ तैसा जाइल :” सर्वज्ञ म्हणीतलें : “तें आतां याचां ठाइं नाहीं की: कीकळी देउनि मुर्चीत पडिले : इतुकेनि पडतपडतां तेही उचलुनि घरासि नेला : मग तीही गोसावीयांसि आवारासि नेलें : मर्दना जाली : मार्जनें जालें : पुजा केली : आरोगण १० जाली : मग गोसावीं बीजें केलें:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: