shri chakradhar swami

३८ श्रीप्रभूभेटि

दाभवीहीरीकडौनि आमचां गोसावीं बीजें केलें : पैलीकडौनि श्रीप्रभू आपवीहीरेयाकडौनि खेळतखेळत बीजें केलें : पीवळतळौलियांमध्ये वेढे करीत होते. तेथ दोहीं देव

भेटि जाली : खालिली तळौलीचीए वाव्य’ काठी दोहीं देवां भेटि जाली : गोसावी आपणेयां आपण खेमाळींगन दीधलें : न्मस्करिलें : मग श्रीप्रभूगोसावीयांसि पीवळतळौलीचीए पाळीसि आसन जालें: आमचेयां गोसावीयांसि श्रीप्रभूपुढां माडेखुंटी आसन जालें : मां एरएरां गोसावी आपुलीया भासा काइ बोलत होते तें नेणिजे : तें देओचि जाणति : मग श्रीप्रभूगोसावीं रीधपुरासी बीजें केलें : आमचे गोसावी अवळोकीत होते : श्रीप्रभूगोसावी खेळ करीतकरीत बीजें केलें : जवं देखति तवं आमचे गोसावी पाळीवरौनि अवळोकीतचि होते : मग गोसावीं ‘जयजये’ करूनि नमस्करिलें : मग आमचां गोसावीं दाभवीहीरी बीजें केलें : मग मलिनाथीं : बहीरवीं : अवस्थान जालें :॥

दर्भेस्वराचीए देउळीएं अवस्थान : गोसावी पाणीपात्रासि बीजें करीति : उतरीली वेसिदारें नगराआंतु रीगति : पूर्वीले वेसिदारें नीगति : दर्भाळां घाटी श्रीचरणेकरि: चीरेयावरि उदक घालीति : श्रीकरिचे पाणीपात्र घालीति : आरोगण करीति : पाळीसि पीपळ : तेयातळि आसन : वीळिचीए वेळे : तरि पसिमीलीकडे आसन : उदीयांचीए वेळे तरि पूर्वोलीकडे आसन : दीस स्याळे : ओतपळीए बैसति : बहीरवीं पहुडु होए :॥

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: