shri chakradhar swami

४२ ससीकरक्षण

एकी गावी गोसावीयांसि वस्ति जाली : वीहरणा बीजें केलें:वृक्षा एकाखालि गोसावीयांसि आसन जालें होतें’ : दोहों पारधीयां होड पडली : ‘जेयाची सुनी ससा टाकी तो होड जीके :’ दोहों पारधी ससा सोडिला : रानी दरादरकुटा नाहीं : ओहळखोहळ नाही : ऐसें समस्तळ भूमिका पाहिली : ससा सोडिला : तेयासवें सुनी लागली : ससा पळतु जातु होता : तवं गोसावीयांतें देखिलें : आणि गोसावीयांतें टाकुनि आला : सर्वतें म्हणीतलें : “माहात्मे हो : या:” म्हणौनि गोसावीं जानु उचलिली: तो एउनि गोसावीयांचीए जानुखालि रीगाला : श्रीमूर्ति अवळोकुं लागला : तवं मागीलाकडौनि सुणीयां आलीया : तीया पुढां उभीया राहिलीया : तीयामागिलाकडौनि पारधी आले : ते पुढां उभे राहिले : दंडवत केलें : श्रीचरणां लागले : मग तेहीं गोसावीयांतें वीनवीलें : “जी जी : ससा सोडावा :” सर्वज्ञ म्हणीतले : “हा नेदिजे :” तेही म्हणीतलें : “ हा होडेचा ससा : देयावा जी : याकारणे सुरीया काढणीयां होती :” सर्वज्ञ म्हणीतलें : “हां गा : एथ सरण आलेयां काइ मरण असे ? मग तीही श्रीमुखाची वास पाहिली : जी जी : तरि हा गोसावीं राखिला :” ऐसें म्हणौनि ते नीगाले : मग नीगतां सर्वज्ञ म्हणीतलें : “हां गा : ए रानीवनी असति : तृण खाति : नदीवाहाळाची उदकें पीति : यांतें तुम्ही कां गा मारा? एं तुमचे काइ करीति?” “जी जी तरि आजिलागौनि ? न मरूं : आणि काइ :” ऐसें म्हणौनि तेहीं दंडवत केलें : श्रीचरणां लागले : मग नीगाले : ते गेले : गोसावीं वरती जानु उचलीली : आणि तेयांतें अवळोकुनि सर्वतें म्हणीतले : “माहात्मे हो : आतां जा :” आणि नीगाला :।।

एका गावी श्री चक्रधरांचा मुक्काम झाला. श्री चक्रधर एका झाडाखाली आसनस्थ बसले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: