गोसावी गोपाळाचेया’ देउळासि बीजें केलें : दारसाखांपासि उभेयां ठाउनि दोन्ही दारसाका श्रीकरें धरूनि भीतरि अवळोकिलें : तवं आवघीया मासोउपवासिनी बैसलीया असति : तेयांतें गोसावीं अवळोकिलें : गोसावीयांतें देखौनि तेयांआंतु एकि उठिली :
: श्रीचरणां लागली : श्रीमुखिचें तांबोळ मागीतलें : “जी जी तांबोळ देयावें :” गोसावीं अनुकारेंचि दाखविलें : “या अवघीया देखत असति की : ना जी : तैसें काही नाही : याचें काइ? गोसावीं देयावें: ” गोसावी गरुडाचेया साजेयापासि बीज केलें : गरूडारा गोसावीयांसि आसन जालें : तेथ तांबोळासि तीया हातु ओडवीला : गोसावीं तांबोळ . दीधलें : आणि तेयांसि स्तीति जाली : आणि आपुलां ठाइं जाउनि बैसली : मग गोसावीं बीजें केलें:॥
11 तें आपुलें कर्म वीसरली : तवं तीची परिचारका आली : तीएपुढां तेही सांघीतलें : इयेचा मासोउपवासु भंगला : एक माहात्मे आले : तेयांचे उचीष्ट तांबोळ घेतलें :’ आणि तीए दीउनि भूलली ऐसी ठाकली : एकी म्हणीतलें : “वायो ढळला :” एक म्हणति : “पीसें लागले :” तवं धाकुटा भाउ आला : तो उचलुनि आपुलेया घरासि घेउनि गेला : देव्हारेयावरि बैसवीली : ऐसी बारा वरीखें स्तीति भोगीत बैसली होती : गोसावीयांसि आपणेयांपासि देखतीचि असे : बारा वरीखां स्तीति भंगली : आणि एकसरी बोबाउनि उठिली : “नागवलीएं ओ : नागवलीएं ओ : आणि दुख करूं लागली : तवं तेही म्हणीतलें : “आवो : कैसी नागवलीसि?” “आतांचि गोसावी होते : आतांचि गेले :” तेही म्हणीतलें : “तरि आम्हीं देखों ना?” तीया म्हणीतलें : “तुम्हीं देखा ना : परि मी देखें की : ते जरि पुरूख भेटती तरि माझें देह वांचल : ए-हवीं देह त्येजीन :” तवं धाकुटा भाउ कणवाळु : तेहीं पुसिलें : “ते कैसे असति?” “ना गौर श्रीमूर्ति : लंबकर्ण : वीसाळनेत्र : अजानबाहु” : डावीए भवैवरि कांदि : ऐसे असति :” मग धाकुटा भाउ नीगाला : तेयांसि बहीणि थोर पढीए’२ : तवं गोसावीयांसि गावांबाहीरि वृक्षा एका तळि आसन असे : तवं तेणें गोसावीयांतें देखिलें : दंडवत घातलें : श्रीचरणां लागला : मग अवधी गोष्टि गोसावीयांपुढां सांघीतली : मां गोसावीं तेथ बीजें केलें : घरासि घेउनि आला : गोसावीयांसि तीया दंडवत घातलें : श्रीचरणों लागली : आणि मागुती स्तीति सुभर जाली : घरील क्रीया संबंधी केली : मग तेही पुसिलें : “जी जी : आतां काइ?” सर्वतें म्हणीतलें : “तुम्हीं उठवाल तेव्हळि उठिती : ” तुम्हीं बैसवाल तेव्हळि बैसती : तुम्ही जेववाल तेव्हळि जेविती :” ऐसां गोसावीं तेयांसि एतुला वरू दीधला : मग गोसावीं बीजें केलें : बारा वरीखें तैसीचि स्तीति : एक म्हणति : अनोदकें नाहीं :॥