shri chakradhar swami

४५ मनसीळे ब्राम्हणां स्तीति

शेअर करा

हे गोष्टि गोसावी लुखदेवोबावरि हीवरळीये सांघीतली’ : सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइ एथिचेया नामापासौनि वेधु : कां स्थानापासौनि वेधु :

: सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइ : ब्राम्हणु एक वोटेयावरि एउनि बैसोनि अनुष्टान करूं बैसे की अनुष्टान करूं वीसरे : आणि सुखचि होए :” बडुवा वोटा उदकें सींपीला : तुळसी वाइली : ओटेयावरि पुस्प ठेउनि धुपार्ती मंगळार्ती केली : वाधावणे केलें : पाठी देवतेसि पुजा धुपार्ती मंगळार्ती केली : ब्राम्हणें बडुवांतें पुसिलें : ‘तुम्ही या वोटेयासि धुपार्ती मंगळार्ती करीत असा तें काइ?’ तीही म्हणीतलें : ‘एथ पुरुख एक होते: ते बरवे कैसे : सौंदरीयें लावण्ये आथिलें : ते येथ होते तवं तेयांसि करूं : ते गेले : तरि या ओटेयासि करूं : ‘ तेहीं बडुवांतें पुसिलें : ‘ते कवणीकडे गेले?’ ‘ना ते मनसीळेकडे गेले : ‘ तैसाचि तो मनसीळेसि आला :

तवं गोसावीयांसि तळेयाचीए पाळी आसन होतें : ब्राम्हणे एउनि गोसावीयांसि दंडवत घातलें : श्रीचरणां लागौनि पुढां बैसला : गोसावीं तेयातें पुसिलें : ‘भटो : हे तुम्हां श्रुत की दृष्ट ?’ ‘ना जी : श्रुत जी : भोगरामिचा बडुवीं गोसावीयांचे बरवेपण : सौंदरीयें लावण्य सांघीतलें : तेयांतें मीयां पुसिलें : ते कवणीकडे गेले?’ ‘ना ते मनसीळेकडे गेले :’ ‘तैसाचि मी एथ आलां जी :’ आणि तेयांसि स्तीति जाली :” मग गोसावीं तेथौनि बीज केलें :।।


शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: