रवळेन’ कुंभारें गीतू केला : गोसावीयांसि गोमतीचां तिरी गुंफा : तेथ आसन असे : तो तेथ आला : गोसावीयांपुढां गीतू म्हणीतला : तवं गोसावी उगेचि : मग तेणें पुसिलें : “जी जी : गीतू कैसा जाला?” सर्वतें म्हणीतलें : “तूझा नीर्वंसू होए ऐसा जाला : “.
रवळ्या कुंभाराने एक अध्यात्मिक गीत रचले. गोसावींची गोमतीच्या तीरीं गुहा होती तेथे बसत. तेव्हा रवळ्या कुंभार तेथे आला आणि गोसावी पुढे गीत गाऊ लागला. गोसावी निवांत बसलेले होते. गीत म्हणून झाल्यावर रवळ्या कुंभाराने विचारले की “गीत कसे झाले?” त्यावर सर्वज्ञ म्हणाले की “तुझा निर्वंश होईल असे झाले.”