गोसावी’ आसनी उपविष्ट असति : जवळे कव्हणी बैसले असति : तेहीं पूसीलें : “हे काइ जी : उचीष्ट बोणें कैसें ?” गोसावी म्हणीतलें : “सारंगधराचा भोपा : दीवा जात होता : ते वाति गेली : म्हणौनि बोटें आबूथीली : तो पोळला : तैसीचि तोंडी आंगुळी सूदली : तैसेंचि सारंगधरा बोणे दाखवीलें :” तोचि मासू : तोचि दीसू लीखीत पाठवीलें : तवं साचचि : तेयां आश्चर्ये जालें : ।।
गोसावी आसनी बसलेले असतात. जवळ कुणी बसलेले असते. ते विचारतात. “हे काय जी? उष्टे नैवेद्य कसे? गोसावी म्हणतात. सारंगधराचा भोपा दिवा विझत होता म्हणून वात पुढे सरकवण्यास गेला. त्याची बोटे पोळली. म्हणून त्याने ती तशीच तोंडात घातली. आणि तसेच सारंगधरास नैवेद्य दाखवला. त्याच दिवशी समोरील व्यक्तीने पत्र पाठवून खात्री करून घेतली. तेंव्हा त्याला कळले की सत्य आहे. त्याला खूप आश्चर्य वाटले