कव्हणां एकाचां घरीं श्राध होत होतें : तेथ गोसावी एती म्हणौनि नीर्वडी केली: दारवठा घातला : गोसावीं तेथ उत्पवन करूनि बीजें केलें : खीरीची दोनि अळदी नीवतें घातली होती : तेथ आरोगणा केली : मग मूत्र केलें : तें सोनें रूपें जालें : मग तेथौनि बीजें केलें :॥.
कुणा एकाच्या घरी श्राद्ध होते. तेथे गोसावी येणार म्हणून निर्वाडी (निरवानिराव, व्यवस्था) केली. दारवठा (उंबरा) घातला. गोसावी तेथे गेले. दोन मातीच्या भांड्यात खीर थंड करायला ठेविली होती. तेथे भोजन केले. मग मूत्रविसर्जन केले. त्याचे सोन्यारुप्यात रूपांतर झाले. मग गोसावींनी तेथून प्रयाण केले