gurhaal.com
२१ अवस्थास्वीकारू - गुऱ्हाळ
गोसावी उघडेच फिरत. त्यांच्या अंगावर काट्यांनी ओरखडे निघत. त्यातून रुधिराचे थेंब निघे. ते शरीरावरच वाळत. या लाल रक्ताबिंदूंमुळे स्वामींचे शरीर माणिक मोत्यांनी जणू सजवले आहे असे भासे. त्यांचे केसदेखील झाडांत, काट्यात गुंतत असे. परंतु ते आपले केस सोडवत नसत. गोसावी तसेच निश्चेष्ट उभे राहत. जर वाऱ्याने त्यांचे केस सुटले तर ते पुढे निघत. किंवा रस्त्याने कुणी आला आणि त्याने जर हे केस सोडवले तरच गोसावी पुढे निघत.
कारभारी