gurhaal.com
२३ मुगताबाइये भेटी - गुऱ्हाळ
गोसावी महादाईसा ला म्हणतात, "बाई, मुक्ताई कसली तापस्विनी होती. साधना करण्यात इतकी मग्न होती की तिचे शरीराकडे अजिबात लक्ष देणे होत नव्हते. अंगावरचे लव (केस) इतके वाढले होते की ते पहाळी गेले. नखे इतकी वाढली की हातापायांच्या नखाच्या चुंभळी वाळलेल्या. डोक्यावरच्या जटा जमिनीपर्यंत पोचलेल्या. दात देखील शेवाळलेले झाले होते. ती बसली तर जटा भुईवर जमा होत. उभी ठाकली तरी जटा भुईपर्यंत पोचत.
कारभारी