shri chakradhar swami

३१ हेडाउवां भेटि

एकी गावीं गोसावीयांसि वस्ति जाली : उदैक गोसावीं वीहरणासि बीजें केलें : नदीचीए थडीए : वृक्षातळि गोसावीयांसि आसन असे : तवं हेडाउ तेलंग देसौनि घोडेयांची हेड घेउनि वोरंगला जात होते : नदीचीए थडीए एउनि ते राहिले : दूसें मांडवीया घातलीया : घोडेयांचे लाहास दीधलें : द्वासनीं’ बळीयाविलें : मग आपण नदीसि संध्यावंदनासि आले : तवं गोसावीयांतें राजकुमरांऐसें देखिलें : अवघेचि’ गोसावीयांजवळि आले : दंडवतें घातलीं : श्रीचरणां लागले : वीनतकंदर होउनि गोसावीयांजवळे’ बैसले : मग घोडेयांचीया गोष्टी करूं लागलेः जातिसूध घोडे ते ऐसेऐसेः सर्वज्ञ म्हणीतलें: “जातिसूध घोडे ते काइ ऐसे? ते ऐसे की :” मग गोसावी तेयांसि घोडेयांची जाति दीपें नीरो’ आदरिलीं : सर्वज्ञ म्हणीतलें : “जातिसुधू घोडा एकु आति : तेयातें एकाधा एकु : सभेआंतुनि मागिलीकडुनि पासाळावरी हरळेकरूनि ऐसा हाणे : आणि ऐसा रोहके दृष्टी तेयांकडे पाहे : दुसरीएकडुनि जरि हाणे तरि तेउताही रोहके पाहे : तो आपुलें करणीए करीतुचि असे : परि तो घोडा तेयावरीली रोहंक दृष्टी फेडी ना : तो जेउतजेउता जाए तेउततेउतेंचि तो घोडा पाहे : ऐसा जातिसूधू घोडा एकु आति : गोसावी तेयांचि घोडेयांतु दाखविला : तेही म्हणीतलें : “जी जी : आम्ही हे परिसोंचि नेणों : मां बोलौनि काइ जी? जी जी : अस्वहृदए तें गोसावी जाणति : जी जी : याची आम्ही सोएहीं नेणों : भाख नेणों : हे गोसावीं नीरोपावें : आणि गोसावींचि आइकावें :” मग अवघे हेडाउ आड पडिले : दंडवतें घातली : मग तेहीं गोसावीयातें वीनवीलें : “जी जी गोसावी आमचेया दूसासि बीजें करावें जी :” गोसावीं मानिलें : मग तेयांचेया दूसासि बीजें केलें : तीही ओलणी दीधली : मर्दनामादणे जालें : आरोगण जाली : गुळुळा जाला : वीडा जाला : गोसावी आसनी उपवीष्ट जाले असति : ते अवघे ओळगे बैसले असति : मग तेही यांतें वीनवीलें : “जी जी : ओरंगल नगर बरवें जी : गोसावीं तेथ आम्हांसरिसेंबीजें करावें जीः” सर्वतें म्हणीतलें : “तेंएथ पूर्वदृष्ट असे :”तीही म्हणीतलें: “जी जी : या घोडेयांची हेड घेउनि जात असों : गोसावी जरि हे घोडयांचिए हेडेसरीसें बीजें करिती तरि आम्हां लाभांचे लाभ होती जी :” गोसावीयां ओरंगला बीजें करावयाची प्रवृति : मां गोसावीं तेयांची वीनवणी स्वीकरिली : मग गोसावीयांसि तेहीं बरवीं लुगडी ओळगविली : आंगीया ओळगविलीया : घोडा ३ ओळगविला : गोसावी घोडेयावरि आरोहण होति : आणि तो कळविला ऐसा होए : ऐसा आवघेयां घोडेयां संबंधू दीधला : मा घोडेयाचीए हेडे हेचि समर्थ : ऐसें गोसावीं ओरंगला बीजें केलें : तीनि गाउवें ओरंगल नगर : उदैक पलाणिवलाणि५ होए : घोडे पुढां नीगति : मा वाजंत्रे वाजति : मग गोसावी बीजें करीति : एककु घोडा एककु दी ओळगवीति : ऐसें वोरंगला बीजें केलें : नगराबाहीरि दुसें पडिलीं : गोसावी हेडाउवांचे मुदल हेडाउ आणि ते आवघे अनुखंगीत : सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइ : तेथिचेया रायाची वेवस्ता ऐसी : जें आधीं अवघे घोडे रायासि दाखवीजति : मग रायासि लागति ते राओ घे : मग गाविचे वाणीएवेव्हारे घेति :” मग गोसावी अवघे घोडे रायापासि दाखवीले७ : राया लागति ते राएं घेतले : एर राणेराउती ठकठाकुरी घेतले : मग गावीचे वाणीएवेव्हारे आले : तेयांसि जे लागति ते तेही घेतले : बाहीरिलाकडुनि जे एति तेयांपुढां काढूनिया घोडा दाखवीति : तवं दीठीतळि नैए : गोसावी मध्यावर्ती : मग गोसावी आंगीयाचीया बाहीया ऐसीया वरतीया करीति : आंगीचे पालव सरीसे करूनि ऐसें पोटेसी खोवीति : मां घोडा गोसावी ऐसा करूनि दाखवीति : आणि घोडेयासि तेज ए : मां घोडा गगन कवळीतु दीसे ते म्हणति : “ऐसी वस्तु आमचेया हातासि एइल :” गोसावी सत्यावर्ती: हातासन दावीति : हेडाउवांतें गोसावी म्हणति : “एक सहस्रा ओपा :” बाहीरिलाकडौनि जे आले असति तेयांतें म्हणति : “दों सहस्री घोडा :” ऐसें एरएरां घडवीति : बाहीरिलाकडौनि जे आले असति ते ऐसें म्हणति : जे२१ “हा घोडा गोसावी आम्हां दो सहस्रीं२ टकां देति तरि आम्हांसि सवंगु ए :” आणि हेडाउ ऐसें म्हणति : “हा घोडा सहस्रा२ टकेया जरि वीके तरि आम्हांसि थोरू लाभू होए :” ऐसें गोसावीयांसि हातासन होए: पाठीं गोसावीं “दीढा सहस्रा ओपा :” म्हणति : मग गोसावी तो घोडा पन्हरासेंयां तेयां देति : मग बाहीरिलाकडुनि जे आले असति ते म्हणति : “हा घोडा आम्हां पांचांस्यां सवंगु दीधला : आमची पांचसें वांचलीं२५ :” आणि हेडाउ म्हणति : “आमची पांचसें गोसावीं अधिकं केली : आम्हां पांचसें फळली :” ऐसें एरएरां सुखचि होए : ।।

एक गावी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: