shri chakradhar swami

४१ वींझी गोंडवडा अवस्थान

एक दीस माहादाइसें भीक्षा करूं गेली होती : तवं भूतानंदाची नाति लळीताइसें आणि भवंताली लेकरूवें बैसलीं असति : तवं लेकरूवांतें चींचकरंटां भातु रांधितां देखिला : तो चटपटां कढे : तीएं बुडि जाळु करिताति : तें देखौनि माहादाइसां वीस्मो जाला : आली : मां गोसावीयांपुढां सांघीतलें : “जी जी : मी भीक्षा करूं गेलीएं : तवं लेंकरूवें चींचकरंटां भातु रांधितें होती : ते काइ जी?” गोसावी म्हणीतलें : “बाइ : आति :

( “हे पुर्वी वींझीं गोंडवडां होतें’ : तेयां गोंडांसि याची प्रीति संचरली : तें तीएं यांसि ऐसेंचि करीति : वेळुवाचें कांडे तोडुनि आणीति : वींधति : वींधौनि भीतरि तांदुळ घालीति : पाणीयांची सीर तीयेचि जाणति : ऐसेंऐसें खणति : आणि बरवें नीर्झर उदक नीगे : पाणी आणीति : तांदुळ आणि नीगुतेंचि पाणी वेळुवाचां कांडां घालीति : मागुती डांबीरि घालीति : वरि सेणेमातीया बोंबीति : अग्नि पाडीति : मग अग्नीआंतु घालीति : मां होतें पदन तीएंचि जाणति : मग काढीति : काढुनि’ चीरीति : चीरूनि माउळीचेया पानाची पातळि करीति : मां तेयांवरि नळांचा भातु घालीति : दोनि दोणे करीति : एकी दोणां आघाचा मधु घालीति : एकी दोणां पाणी घालीति : एकि पातळीया वरि झांकीति : मग गोसावी वीहरणासि बीजें करीति : ऐसे तीएं गोसावीयांची वाट पाहाति : यासि उसीरू लागे : मां यातें नेदखति : मां यातें कुवारीति : याचीए गिवसनीए रीगति : यातें झाडोझाडी गीवसीति : ‘देवनें देवनें :’ ‘कीलु कीलु’ म्हणौनि बोलावीति : मग गोसावी बीजें करीति : मां यातें देखौनि हरीखैजति : दंडवतें घालीति : श्रीचरणां लागति : श्रीचरणांवरि माथा ठेवीति : श्रीचरणांवरि लोळति : मोमे देति : गाति : नाचति : टाळीया वाति : नाना पुस्पं आणीति : गोसावीयांसि पुजा करीति : मग यासि आरोगण देति : ऐसें गोसावीयांसि नीच करीति : मग गोसावी तेथौनि बीजें करीति : :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: