shri chakradhar swami

४४ भोगरामों अवस्थान

गोसावीयांसि खडकुली अवस्थान : तवं भोगरामिचीया बाइया : तेहीं गोसावीयांतें देखिलें : आणि तेही म्हणीतलें : “हे आमचे नगीनदेव मां :” तवं बाइसी पुसिलें : ‘बाबा ः नगीनदेव म्हणीजे काइ?” याउपरि सर्वज्ञ म्हणीतलें :“बाइ : हे पूर्वी भोगरामी होतें :” यावरि हे गोष्टि सांघीतली’ :

भोगरामी गोसावीयांसि ओटेयावरि अवस्थान : रामाचां देउळी : उदेयांचि गोसावी आसनी उपविष्ट असति’ : तवं बोणेबाइया देवतेसि दंडवता आलीया : तेही गोसावीयांतें देखिले : दंडवत केलें : श्रीचरणां लागलीया : मग गोसावीयांतें पुसिलें “बाः आपणेयांसि नावं काइ नगीनदेव ?” गोसावीं श्रीमुगुटेंचि मानीलें : मग तीया रामासि गेलीया : पुजा केली : मग मागुतीया आलीया : गोसावीयांतें वीनवीलें : ” 1: बा नगीनदेव हो : आमचीये गुंफे बीजें करावें :” गोसावीयांसि बीजें करावेयाची प्रवृति : गोसावीं वीनवणी स्वीकरिली : गोसावीं तेयांचीये गुंफेसी बीज केलें : आसन रचिलें : गोसावी आसनीं उपवीष्ट जाले : तेहीं गोसावीयांसि आरोगण दीधली : गुळुळा जाला : वीडा जाला : मग तेहीं गोसावीयांतें वीनवीलें : “बा नगीनदेव हो : जवं एथ असिजैल तवं एथचि एउनि आरोगण करावी बा : उदीयां जैसें असे तैसें आरोगिजे बा : वीळिचां भीक्षा करूनि एउनि : बा जैसें असैल तैसें आरोगावें बा :” गोसावीं तेयांची वीनती स्वीकरिली : गुंफेसि आरोगण होए : कदाचीत पाणीपात्रा बीजें करीति : रामाचां देउळी ओटेयावरि पहुडु होये : तेथिचे बडुवे आधी गोसावीयांचेया श्रीचरणांवरि फुलें ठेवीति : धुपार्ती मंगळार्ती करीति : पाठी देवतेसि पुजा करीति : धुपार्ती मंगळार्ती करीति : पाठी हे गेलेयां उपरि एथिचेया अस्थानासि करीति : ऐसें गोसावीं केतुले एक दीस तेथ राज्य केलें : मग गोसावी तेथौनि मनसीळेसि बीजें केलें :।।

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: