shri chakradhar swami

४६ भांडारकारां भेटि

Zमग गोसावी तेथौनि भांडारेयासि बीजें केलें : गोसावीयांचां कटिप्रदेसी सुडा : श्रीमुगुटीं सुडा’ : गोसावीं भांडारेकारांचेया आवारासि पाणीपात्रासि बीजें केलें : तया नावं नीळभट : ते काणव’ : तवं भांडारेकारांचीया ब्राम्हणी भांडारेकारांलागि आंघोळी पाणी सारिलें होते : भांडारेकारांसि अभ्यंगाची आइति होत असे : भांडारेकारी “उतरासंगें धोत्र घातले असे” : ओसरीएवरि बैसौनि पोथी वाचीत होते : तवं अर्थ अवगमे ना : तो अर्थं मागिलीए फाकीए असे : ते पुढील फाकी पाहात होते : तवं भांडारेकारांचेया ब्राम्हणी गोसावीयांसि पाणीपात्र दीधलें : परि ते गोसावीयांची वास ऐसी धातीया दृष्टी न पाहातीचि : मग गोसावीं साउमेयां बीजें करूनि म्हणीतलें: ‘भटो : मागीलि फाकी पाहा :” आणि तेहीं गोसावीयांकडे प्रतौनि पाहिले : आणि गोसावीयांतें देखिले : मग पोटी म्हणीतलें : “ज्ञातार होति : काळु रूसला : मां काळातें बुझाउं नीगाले : किं काळाचिवरि रूसले : ऐसें दीसताति : अवेव गळले असति : तेया वार लाविले असेति : भोजनअर्थीयां भोजन मीळे : मां यां न मीळे : तरि माझे हीतक्ष होति :” सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइ : भांडारेकारां दरीसनासवेंज्ञानत्व : सुहृदत्व : हीतक्षत्व एं तीन्हीं उमटली :” ऐसें जाणीतलें : तैसेंचि गोसावीं बीजें केलें : तेही गोसावीयांसरिसे नीगाले : तेयांची ब्राम्हणि दारवठावरि आली: तेही म्हणीतलें : काइ तुम्हीं के नीगालेति? तुम्हां पाणी सारिलें असे :” गोसावीं एवं मागुती वास पाहीली : तेहीं’ म्हणीतलें: : “हे इतुके दीस तुम्हापासि होतें : आतां'” जेयांचे तेयासवें नीगालें : तुम्हीं राहा :” आणि तीएं या सबदासरिसींचि राहिली : मग माहादाइसी पुसिलें : “हां जी : तीएं राहाविली : आणि सबदासरिसी राहिली कैसी जी?” सर्वतें म्हणीतलें : “बाइ : तीएं आज्ञाधरें की : तेयांची काढिली रेख नोलांडीति :” मग तैसेंचि गोसावी देवकी तळेयासि बीजें केलें : डावेनि श्रीचरणें सीळेवरि उदक घातलें : श्रीकरिचे पाणीपात्र घातलें : भांडारेकार सोळा हातेया साउलेयाचे धोत्र : उतरासंगें नेसले होते : तें अर्ध फाडिलें : गोसावीयांसि आसन रचिलें : गोसावी आसनी उपवीष्ट जाले : भांडारेकार पुढां मांडेखूटी घालुनि बसले असति : गोसावीयांसि आरोगण जाली : गुळळा जाला : भांडारेकारी प्रसादु घेतला : मग पोटीं मनोर्थ करूं लागले : जे ‘माझें गोसावियांचां ठाइं काहीं प्रवेसन नव्हेचि : मी काहींचि घेउनि न नीगेंचिः’ ऐसें दूख करीत बैसले : सर्वसें म्हणीतलें: ‘भांडारेकार हो : मनोर्थ करीत असा तो एथौनि सीधी नेइजैल हो : ” भांडारेकारा दरीसनासरीसें ज्ञात्रुत्व : आप्तत्व : प्रतीति : तीन्हीं अवधारिली : सर्वतें म्हणीतलें : :

भांडारेकार उठों बैसों जाणति : तैसें कोण्हीचि नेणति :” भांडारेकारां सोळा वरीसें सन्यधान : परि पुष्टिवीभाग कहीं देखिलाचि नाहीं : ।।

माग स्वामींनी तिथून भंडाऱ्यास प्रयाण केले. शेरा चक्रधर swami Inchara

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: