चक्रधर स्वामी

७ सारंगधराचा चांदोवा वीझवणे

गोसावी आसनी उपविष्ट असति : एकू दीस गावीचे माहाजन बैसले असति : तवं गोसावी हास्य करूनि श्रीकर कुसकरीले : तवं काळे जाले : मग तेहीं पूसीलें : “जी जी : श्रीकर काळे कां जाले?” गोसावी म्हणीतलें : “सारंगधरीचे भोपे सारंगधरासि आर्ती करीत होते : ते चांदोवेयासि आगी लागली : ते एथौनि वीझवीली :” तवं तेयांसि …

७ सारंगधराचा चांदोवा वीझवणे Read More »

५ कऱ्हे कुचकी आसन

कव्हणी एकू ब्राम्हणू द्वारावतीएसि नीगाला : तवं काबा वाट घेतली : आवघे गेलें: बैलू गेलाः बाइला भवरी तोंडी घातली होती:तेवांचलीः द्वारावतीये सहश्रभोजन करीन म्हणौनि नीगाला होता : द्वारावती पावला : सप्ततीर्थीया केलिया : एरी दीसी ब्राम्हणां नीमंत्रण दिधलें : इतुलेनि तो म्हणों लागला : “वेचू नाहीं : वेचैवीन काइ करूं?” मग ब्राम्हणीं भवरि दाखवीली : …

५ कऱ्हे कुचकी आसन Read More »

shri chakradhar swami

१८ जुतक्रीडा

गोसावीयांसि सारी जुं खेळावेयाची प्रवृति : मग गोसावी प्रतदीनीं जूआंठेयासि बीजें करीति : सारी जुं खेळावेयाचें वेसन स्वीकरीति : गोसावी प्रतदीनीं सारी जुं खेळति : जीतुकाही जीणा ए तीतुका दानासि देति : एकु दीं गोसावीं हारिची प्रवृति स्वीकरिली : बहुत जुं हारवीलें : मग पाउगीयें पायांवरि हात ठेउनि वीनवीलें : “जी जी : आंखू पाहिजो …

१८ जुतक्रीडा Read More »

shri chakradhar swami

१७ पुरस्वीकारू How shri Changadev Raul transmigrated soul in to body of Harpal dev

श्री चांगदेव राऊळ यांनी आपले शरीर त्यागल्यानंतर भाडोच च्या राजकुमार हरपाळदेव यांच्या शरीरात कसा परकाया प्रवेश केला हे या लीळे मध्ये वर्णीले आहे

shri chakrapani prabhu

३ सूर्पमार्जनों क्रीडा Shri Changdev Raul cleans the surrounding

माहादाइसांप्रति सर्वज्ञे म्हणीतले : “बाइ : तेथिची क्रीडा ते ऐसी की : स्त्रीचांगदेवोराउळाचा उजवीये’ सीकरी सुप : डाबीये’ सीकरी खरांटा : बीदी गोदरीया झाडीति: सुपी पुंजे भरीति : ‘श्रीमुगुटावरि ठेवीति : नेउनि गोमतीमध्ये घालिति’ : आणि खुदुखुदुकरि हास्य करीति : ऐसे अनंता दान देति’:”

shri chakrapani prabhu

२ सैहाद्री व्याघ्रवेखें दरीसन Shri Dattatrey Prabhu did shaktipat to Shri Changdev Raul (Gosavi)

सगळे लोक पर्वतावर निघाले. गोसाविदेखील पर्वतावर निघाले. मोकळे केस, मधोमध भांग, श्याम श्रीमुर्ती, अशा वेशात ते देवगिरी वर प्रयाण करतात. त्याचवेळी वेळूच्या जाळीतून गर्जना करत वाघ बाहेर पडतो. श्री दत्तात्रय प्रभू वाघाचा वेष धारण करून येतात. पुढे येऊन उभे ठाकतात. हाक देऊन आपला चवडा उचलून श्रीमुकुटावर म्हणजे चांगदेव राऊळांच्या डोक्यावर ठेवतात. श्रीमुखासी श्रीमुख लावले. तेथे प्रकाश पडला. व्याघ्ररूपी श्री दत्तात्रयांकडून पर आणि अवर हे दोन्ही स्वीकारले. पर अच्छादिले म्हणजे झाकून ठेवले. आणि अवर प्रकट केले. वाघ! वाघ! असे म्हणत मागचे लोक मागे पळाले, पुढचे लोक पुढे पळाले. मग श्री दत्तात्रय प्रभू अदृश्य झाले.

error: