जेव्हा खटल्यातील साक्षीदारांच्या जबान्या सुरू झाल्या तेव्हा सर्वात प्रथम आणि सर्वात महत्त्वाचा साक्षीदार श्री यशपाल कपूर यांचे देखील साक्ष कोर्टामध्ये झाली तिचा हा इतिवृतान्त
सर्वप्रथम इंदिरा पक्षाचे वकील श्री खरे यांनी श्री कपूर यांची साक्ष नोंदवण्यास सुरुवात केली.
श्री खरे: तुम्ही 7 जानेवारी 1971 ला श्री जी. एल. नंदा यांच्यासोबत रायबरेली येथे कशासाठी गेला होता
यशपाल कपूर: मी त्या दिवशी तिथे शहीद मेळावा होता तिथे शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलो होतो.. मी तिथे जवळपास अर्धा मिनिट बोललो असेन परंतु मी त्यात इंदिरा गांधी यांच्या निवडणुकीबद्दल मी एक अवाक्षर देखील उच्चारलेले नाही.
श्री खरे: हा तुमचा कार्यालयीन दौरा होता की वैयक्तिक दौरा होता?
यशपाल कपूर: हा माझा वैयक्तिक दौरा होता त्यासाठी मी कुठलाही प्रवास भत्ता कार्यालयाकडे मागितलेला नाही.
श्री खरे: तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा कधी दिला?
यशपाल कपूर: मी माझा राजी नाम्याचा निर्णय 13 जानेवारी रोजी श्रीमती इंदिरा गांधींना कळवला त्यांनी तो स्वीकार केला आणि मला दुसरी श्री हक्सर यांना भेटायला सांगितले. ते पंतप्रधान सचिवालयात कार्यकारी सचिव होते. त्या दिवशी (13 जानेवारीला) कुठल्यातरी वेळी मी अक्सर यांना कार्यालयात भेटलो आणि माझे राजीनामा पत्र त्यांना दिले. तेव्हा त्यांनी मला विचारले की तुम्ही इंदिरा गांधींना या राजीनाम्याविषयी कळवले आहे का? यावर मी होकारार्थी उत्तर दिले. त्यानंतर ते म्हणाले की तुम्हाला कार्यमुक्त करण्यात येत आहे.
श्री खरे: जर तुम्ही तुमचा राजीनामा 13 तारखेला लाच सादर केला तर मग तुम्ही त्यावर 14 तारखेची सही कशी काय केली?
यशपाल कपूर: कारण मला 14 तारखेपासून कार्यमुक्त करण्यात यावे अशी विनंती मी मॅडमना केली होती.
श्री खरे: इंदिरा गांधी या रायबरेली मधून निवडणूक लढवणार असे केव्हा निश्चित झाले?
यशपाल कपूर: इंदिरा गांधी रायबरेली मधून उमेदवार होणार हा निर्णय एक फेब्रुवारीला झाला. या दिवशी त्यांना रायबरेली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सदस्यांनी विनंती केली की त्यांनी रायबरेली मधूनच निवडणूक लढवावी. या विनंतीनंतर श्रीमती गांधी यांनी उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री कमलापती त्रिपाठी यांचा सल्ला घेतला. त्यानंतर त्यांनी माझ्याशी ही चर्चा घेतली केली आणि त्यानंतरच रायबरेली मधून उमेदवार म्हणून उभा राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
श्री खरे: एक फेब्रुवारी च्या आधी कधीही तुम्ही इंदिरा गांधींसाठी निवडणुकीसाठी काम केले होते का?
यशपाल कपूर: नाही. एक फेब्रुवारी च्या आधी कधीही इंदिरा गांधींनी मला त्यांच्या निवडणुकीसाठी कुठलेही काम करण्यास सांगितले नाही.
श्री खरे: तर मग निवडणुकीच्या खर्चामध्ये एक फेब्रुवारी च्या आधीचे खर्च कसे काय दाखवण्यात आलेले आहे?
यशपाल कपूर: निवडणुकीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीने जो कोणी उमेदवार असेल त्याच्या प्रचारा साठी काही गोष्टी आधीच खरेदी करून ठेवल्या होत्या. जिल्हा कमिटीने केलेल्या खर्चाची पूर्तता करणे मला आवश्यक वाटत होते. त्यामुळेच हा खर्च निवडणुकांच्या खर्चामध्ये समाविष्ट केला.
अशी प्रश्नोत्तरे झाल्यानंतर राजनारायण यांचे वकील श्री शांतिभूषण यांनी श्री यशपाल कपूर यांची उलट तपासणी घेण्यास सुरुवात केली..
श्री शांती भूषण: तुम्ही पंतप्रधान सचिवालयात कधीपासून काम करतात त्या विषयी माहिती सांगा..
यशपाल कपूर: मी पंतप्रधान सचिवालयात 1991 पासूनच काम करतोय.
श्री शांती भूषण: परंतु तुम्ही 1967 मध्ये इंदिरा गांधी यांच्या निवडणुकीत मदत करण्यासाठी तुमच्या पदाचा राजीनामा दिला होता. निवडणूक संपल्यानंतर तीन महिन्यातच तुम्ही पुन्हा सचिवालयात रुजू झाला होता हे खरे आहे का?
यशपाल कपूर: मी राजीनामा दिला हे खरे आहे. परंतु इंदिरा गांधींच्या निवडणुकीशी त्याचा काहीही संबंध नाही. मला सार्वजनिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. निवडणूक संपल्यानंतर इंदिरा गांधींनी मला पुन्हा सचिवालयात रुजू होण्याची विनंती केली आणि ती विनंती स्वीकारून मी पुन्हा त्या पदावर रुजू झालो.
श्री शांती भूषण: तुम्ही 1967 ला निवडणुकीच्या आधी राजीनामा दिला. परत 1971 साली पुन्हा निवडणुकीच्या आधी तुम्ही राजीनामा दिला आणि त्यानंतर तुम्ही इंदिरा गांधींच्या प्रचारासाठी काम केले. हा काही निव्वळ योगायोग नाही. त्यामागे काय कारण आहे?
यशपाल कपूर: ज्या कामाने विधानसभेत किंवा संसदेत जाण्याचा मार्ग मोकळा करेल असे काम करायला सगळ्यांनाच हवे असते.
श्री शांती भूषण: 1971 च्या लोकसभा निवडणुकीत तुमचे नाव रायबरेलीच्या मतदार यादीत होते. तुम्ही रायबरेली मध्ये राहता काय?
यशपाल कपूर: नाही. मी जरी सात आठ वेळा रायबरेलला आलो तरी मी दिल्लीतच राहतो.
श्री शांती भूषण: तर मग तुम्ही मानता की 1970 मध्ये तुम्ही उत्तर प्रदेश मधल्या कुठल्याही शहरात किंवा जिल्ह्यात राहत नव्हता. तर मग काय मतदार यादी मध्ये दर्शवण्यात आलेला तुमचा निवासी पत्ता चुकीचा आहे का?
यशपाल कपूर: मी त्याला चुकीचे म्हणणार नाही. मला आठवतं की जेव्हा मतदार याद्यांची तपासणी चालू तेव्हा मी रायबरेली मध्ये होते. मला सांगण्यात आले होते की माझे नाव रायबरेलीच्या मतदार यादीत टाकण्यात आले आहे.
श्री शांती भूषण: तुम्हाला विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही अजूनही दिलेले नाही. मतदार यादी मध्ये दिलेला रायबरेलीचा पत्ता बरोबर कसा असू शकतो? जेव्हा की तुम्ही स्वतः हे मान्य केले आहे की तुम्ही या कालावधीमध्ये उत्तर प्रदेशच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये रहिवासी नव्हता. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल.
यशपाल कपूर: मी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही.
श्री शांती भूषण: जरा लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 197 वाचा आणि जरा सांगा की जर तुम्ही एखाद्या राज्याचे रहिवासी नसाल तर त्या राज्यासाठी तुम्ही राज्यसभेवर सदस्य म्हणून जाऊ शकता की नाही?
यशपाल कपूर: कलम 197 मध्ये सामान्य रहिवासी असे लिहिलेले आहे. परंतु माझे अजूनही असे मत आहे की एखाद्या राज्याचा रहिवासी नसलेला व्यक्ती हा त्या राज्याचा राज्यसभेचा प्रतिनिधी म्हणून जाऊ शकतो. जेंव्हा मतदार याद्या सुधारित करण्यात आल्या त्यावेळी मी रायबरेलीचा सामान्य रहिवासी होतो.
श्री शांती भूषण: जर तुम्हाला इंदिरा गांधी रायबरेली मधून निवडणूक लढवणार हे पंधरा तारखेला माहीत नव्हते तर मग तुम्ही 15 जानेवारीला रायबरेली इथे कसे? तिथे काय करत होतात?
यशपाल कपूर: माझ्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मी लखनऊला गेलो आणि कमलापती त्रिपाठी यांना भेटलो. त्यांनी मला उत्तर प्रदेशच्या पूर्व भागांमध्ये दौरा करायला सांगितला. रायबरेली देखील पूर्व उत्तर प्रदेश मध्ये येते. मी 15 जानेवारीला रायबरेलीत होतो हा निव्वळ योगायोग आहे.
श्री शांती भूषण: हे 22 जानेवारी 1971 चे वर्तमानपत्र बघा. आहे. यामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की पंतप्रधानांच्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्याच्या उद्घाटनासाठी तुम्ही 70 गाड्यांचा ताफा घेऊन रायबरेली जातीने आला होतात. हे खरे आहे का?
यशपाल कपूर: नाही ही बातमी चुकीची आहे. मला वाटतं त्या वर्तमानपत्राच्या पत्रकाराने आपल्या मनाने ही गोष्ट रचली आहे.
श्री शांती भूषण: तुम्ही 14 जानेवारी ते एक फेब्रुवारी च्या दरम्यान कुठे होतात?
यशपाल कपूर: मी 14 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान रायबरेली इथेच होतो. त्यानंतर मी पक्षाच्या कामासाठी पुढे सुलतानपूर आणि बाराबंकी येथे गेलो.
श्री शांती भूषण: तुम्ही या दोन्ही ठिकाणी कुठे थांबलेला होता?
यशपाल कपूर: मला आता स्पष्ट आठवत नाही. पण मी हे पक्के सांगू शकतो की 21 जानेवारी ते 26 जानेवारी च्या दरम्यान मी दिल्लीत होतो.
श्री शांती भूषण: या पाच दिवसांमध्ये तुम्ही पंतप्रधानांना भेटलात काय?
यशपाल कपूर: मी त्यांना दोन वेळा तरी नक्कीच भेटलो होतो.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे यशपाल कपूर यांची दुसऱ्या दिवशी जेव्हा उलट तपासणी करण्यात आली आणि त्यांना विचारण्यात आले की तुम्ही 13 जानेवारी ते एक फेब्रुवारी दरम्यान इंदिरा गांधींना भेटला होतात की नाही? यावर त्यांनी उत्तर दिले की त्यांना आता आठवत नाही. यानंतर त्यांना विस्तृतपणे निवडणुकांच्या खर्चासंबंधी विचारण्यात आले. त्यावर त्यांनी उत्तर दिले की खर्चा संबंधी मला काहीही माहिती नाही कारण सर्व खर्च हे श्री गयाप्रसाद शुक्ल ( काँग्रेस चा एक नेता ) बघत होते. यावर त्यांना स्वतःच्या ड्रायव्हरला 15 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीसाठी देण्यात आलेल्या पैशाची पावती दाखवण्यात आली.
श्री शांती भूषण: तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही जीप गाड्यांचा वापर निवडणुकांसाठी एक फेब्रुवारीपासून केला. त्यापूर्वी कधीही जीप इलेक्शनच्या कामासाठी लावण्यात आल्या नव्हत्या. तर मग या पावतीमध्ये ड्रायव्हरांना त्या आधीच्या कालावधीसाठी पगार कशासाठी देण्यात आला?
यशपाल कपूर: मी त्यांना 15 जानेवारीपासूनच पगार दिला. कारण मला गया प्रसाद शुक्लांनी सांगितले होते की या ड्रायवरांना पंधरा तारखेपासूनच कामावर ठेवण्यात आले आहे. (कपूर यांच्या म्हणण्या चा अर्थ लावला तर 15 जानेवारी ते 01 फेब्रुवारी या कालावधीत या जीप रायबरेली जिल्हा काँग्रेस कमिटीकडे निवडणुकीच्या कामी वापरात होत्या हे स्पष्ट होते.)
श्री शांती भूषण: निवडणुकीचे रिटर्न्स दाखल करताना निवडणुकीवर खर्चाची बिलं त्यासोबत जोडावी लागतात. मग जसं तुम्ही म्हणाले की या जीप निवडणुकीच्या कामासाठी लावलेल्या नव्हत्या, तर मग या जीप गाड्यांच्या च्या बिलाची रक्कम इंदिरा गांधींच्या निवडणूक खर्चात कशी काय दाखविण्यात आलेली आहे?
यशपाल कपूर: तो खर्च माझ्या चुकीमुळे दाखवण्यात आलेला आहे. माझी चूक झाली परंतु आमची बाजू बरोबर आहे. कारण सर्व खर्च दाखवून झाल्यावर सुद्धा निवडणुक खर्चाची मर्यादा आम्ही पार केलेली नाही. आमचा सर्व खर्च मर्यादेच्या आताच आहे. माझ्या मते ही रक्कम निवडणूक खर्चामध्ये दाखवल्याने काहीही फरक पडत नाही.
यानंतर यशपाल कपूर यांना निवडणुकीशी संबंधित नसलेले काही प्रश्न विचारण्यात आले. जसे की- तुम्ही नवी दिल्लीच्या गोल्फ लिंक या आलीशान एरियात तुमच्या पत्नीच्या नावे घर कसे काय खरेदी केले? त्यासाठीचा पैसा कुठून आला? इत्यादि.
हे प्रश्न मुख्यतः श्री यशपाल कपूर यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे करण्यासाठी विचारण्यात आले होते.
ही उलट तपासणी झाल्यानंतर इंदिरा गांधी पक्षाचे वकील श्री खरे यांनी श्री यशपाल कपूर यांची पुनः तपासणी घेण्याची इच्छा न्यायालयाकडे व्यक्त केली. काही जुजबी प्रश्न त्यांनी विचारले. या तपासणीमध्ये त्यांनी नमूद केले की श्री यशपाल कपूर 1989 साली देखील रायबरेली मध्ये मतदानासाठी आले होते.
श्री खरे यांची तपासणी झाली. पुन्हा शांतिभूषण यांनी या माहितीसंबंधी श्री यशपाल कपूर यांना काही प्रश्न विचारले.
श्री शांती भूषण: तुम्ही 1969 मध्ये रायबरेलीला कशासाठी आला होता?
यशपाल कपूर: मी त्या वर्षी रायबरेलीला माझा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलो होतो.
श्री शांती भूषण: तुम्ही केवळ मतदान करण्यासाठी इतके उत्सुक होता काय की तुम्ही दिल्ली ते रायबरेली असा प्रवास केला?
यशपाल कपूर: खरे तर मला 1957 1962 किंवा 1967 च्या कुठल्याही निवडणुकांमध्ये मतदान करता आले नव्हते. मला माहिती मिळाली की मतदान यादीमध्ये रायबरेलीच माझे नाव टाकण्यात आलेले आहे. मी फक्त माझा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 1959 ला रायबरेलीला पोहोचलो.
इथे श्री यशपाल कपूर यांची साक्ष आणि उलट तपासणी संपली.
Pingback: 5. इंदिरा गांधी आरोपीच्या पिंजऱ्यात Indira Gandhis Statement and Cross examination in Allahabad High court - गुऱ्हाळ