indira gandhi
4. निळी पुस्तिका आणि विशेषाधिकार BLUE BOOK and State Privileges
इंदिरा गांधींनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला की नाही हे ठरवण्यासाठी ही कागदपत्रे महत्वाची आहेत असे श्री शांतीभूषण यांना वाटत होते. सरकारने असे करण्यास नकार दिला. कारण सांगितले की ही कागदपत्रे द्यावी की नाहीत यासंबंधी राज्याला (state) काही विशेष अधिकार (Privileges) आहेत. ज्या कागदपत्रांची मागणी राजनारायण यांचा पक्ष करत होता त्याला नाव होते ब्लू बुक (BLUE BOOK). आणि त्यामध्ये पंतप्रधान प्रवासात किंवा दौऱ्यावर असताना त्यांच्या संरक्षणासाठीचे नियम आणि मार्गदर्शक सूचना समाविष्ट होत्या. या पुस्तिकेत असे नमूद होते की पंतप्रधान दौऱ्यावर असताना संबंधित राज्याने त्यांच्या संरक्षणाचा आणि त्यांच्या बैठका आणि सभांची व्यवस्था करायची. या व्यवस्थेचा खर्च देखील ज्या राज्यात हा दौरा आहे त्या राज्याने करायचा. पंडित जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री पंतप्रधान पदावर असेपर्यंत असाच दंडक होता.
3. पुनः सर्वोच्च न्यायालयात Raj Narain Appealed in Supreme Court
सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे नमूद केले की या खटल्यामधील पॅराग्राफ 5 हा अजिबात अस्पष्ट किंवा संदिग्ध नाही. त्याच बरोबर न्यायमूर्ती ब्रूम यांनी यशपाल कपूर यांच्याशी संबंधित काढून टाकलेल्या महत्त्वाच्या इंट्रोगेटरी (प्रश्नावल्या) सुप्रीम कोर्टा ने पुन्हा खटल्यामध्ये समाविष्ट केल्या. न्या. ब्रुम यांच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला त्यांनी चुकीचे ठरवले. एकंदरीतच राजनारायण पक्षाचे पारडे पुनः एकदा जड झाले.
2. खटल्यास सुरुवात Election Petition against Indira Gandhi
परंतु राज नारायण यांनी आपल्याकडे आशा वकिलांना देण्यासाठी पैसे नाहीत असे सांगितले. परंतु नंतर राज नारायण यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री श्री सी. बी. गुप्ता यांची भेट घेतली. गुप्ता आणि श्री शांतीभूषण यांचे चांगले संबंध होते. हा आधार घेऊनच श्री शांतीभूषण यांनी राजनारायण यांचा खटला लढवावा अशी गळ त्यांना गुप्ता यांच्याद्वारे घालण्यात आली आणि ती त्यांनी मान्य केली.
1. आणीबाणीची पार्श्वभूमी Before decleration of emergency in india
हा खटला अनेक अंगाने महत्त्वाचा होता. 1971 च्या निवडणुकीद्वारे श्रीमती इंदिरा गांधींना पंतप्रधान पद मिळाले होते. त्या पंतप्रधान पदासाठी आवश्यक असणारे लोकसभेचे सदस्यत्व या खटल्याद्वारे धोक्यात येत होते. जर हा खटला राजनारायण यांनी जिंकला आणि जर इंदिरा गांधींची निवडणूक रद्दबातल ठरली तर इंदिरा गांधींचे पंतप्रधान पद पण धोक्यात येणार होते