आठवणी माझ्या शाळेच्या मस्ती आणि प्रेमाच्या सहज सुलभ जगण्याच्या विचारांतून घडण्याच्या मैत्री, शिस्त आणि थोड्या बेशिस्तीच्या आठवणी माझ्या शाळेच्या माझी शाळा एक जगण्याचा जिव्हाळा ज्ञानाचा फुललेला मळा उत्स्फूर्त एक सोहळा माझी शाळा घर सोडून जेव्हा पाहिल्या प्रथम आलो उंबरठ्यावर तुझ्या थोडा भ्यालो, घाबरलो, बावरलो तुझ्यापासून दूर पळूनही गेलो परंतु, जडला जीव थोड्या दिवसांत मग मात्र मी विरून गेलो तुझ्यात विसरून घर दार माझे एकरूप झालो नव्या रुपात तू कोण आहेस माझा? तू माय, तू बाप, तू गुरू, तू ईश्वर बाकी माझ्याकडील सर्व काही नश्वर तू आम्हा सर्वांचा परमेश्वर ……….. कबीर