एक होता मुलगा

शेअर करा

एक होता मुलगा
त्याला गवसला हुलगा

हुलग्याची केली उसळ
जेवायला आलं मुसळ

मुसळ झालं खूष
बाहेरून आली घूस

घुशीनं केलं बीळ
बिळात गवसला तीळ

तिळाचं काढलं तेल
तेलात तळली भजी

भजी खाल्ली फार
आईनं दिला मार.

शेअर करा

Leave a Reply

error: