माझी बाहुली

शेअर करा

लहान माझी बाहुली
मोठी तिची सांवली

घारे डोळे फिरवीते
लुकूलुकू ही पहाते

नकटे नाक उडवीते
गुबरे गाल फुगवीते

दांत कांही घासत नाही
अंग कांही धूत नाही

भात केला, करपून गेला!
पोळया केल्या, कच्च्या झाल्या!

वरण केले, पातळ झाले
तूप सगळे सांडून गेले

असे भुकेले नक्का जाऊ
थांबा करते गोड खाऊ

केळीचे शिकरण करायला गेली
दोनच पडले दांत

आडाचे पाणी काढायला गेली
धपकन् पडली आत!
                                                        - रा. बा. खानवलकर

शेअर करा

Leave a Reply