जेव्हा इंदिरा गांधी साक्षीदार म्हणून येण्याचे ठरले तेंव्हा हा खटला एकदम प्रकाश झोतात आला. प्रसार माध्यमांची उत्सुकता शिगेला पोचली. देशाच्या इतिहासात तोपर्यंत कधीही पंतप्रधान पदासारख्या अत्यंत महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती साक्षीदार म्हणून कुठल्याही कोर्टासमोर उभा राहिला नव्हता