What is IPO? आयपीओ म्हणजे काय?

सगळ्याच कंपन्यां शेअर मार्केटमध्ये लिस्टेड नसतात. परंतु जेव्हा एखादी कंपनी आपले शेअर शेअर मार्केट मध्ये ते खरेदी साठी उपलब्ध करण्याचे ठरवते तेव्हा त्या कंपनीला सर्वप्रथम शेअर मार्केट मध्ये स्वतःला नोंदणीकृत करावे लागते. एखादी कंपनी जेव्हा आपले शेअर्स बाजारांमध्ये विक्रीसाठी पहिल्यांदाच आणते तेव्हा त्याला इनिशियल पब्लिक ऑफर असे म्हणतात.

शक्यतो एखाद्या कंपनीचे मार्केटमध्ये चांगले नाव झालेले असेल आणि त्या कंपनीने गेले काही वर्ष चांगली वाढ केलेली असते तर त्या कंपनीच्या आईपीओ ला चांगला प्रतिसाद मिळतो. IPO मध्ये एका विशिष्ट प्रमाणात एक गठ्ठा शेअर खरेदी करावे लागतात. शेअर मार्केट मध्ये शेअर चॅट नोंदणी झाल्या झाल्या सर आपण शेअर खरेदी केला तर तो आपल्याला स्वस्तात उपलब्ध होईल आणि कंपनीचा परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे भविष्यात या शेअरचे भाव वाढतील असा विश्वास किंवा अंदाज असल्यामुळे बरेच एजंट लोक IPO मध्ये शेअर खरेदी करणे पसंत करतात. कधी कधी या शेअर्सना खूप मागणी मिळते. आशा वेळेस उपलब्ध असलेल्या शेअरच्या संख्येच्या अनेक पटीत मागणी नोंदवल्या जाते. अशा IPO ला Over-subscribed IPO म्हणतात.

IPO दाखल करायचे अनेक कारणे आहेत

  • निधी उभा करण्यासाठी
  • मोठ्या कॅपिटल एक्‍सपेंडिचर साठी
  • कर्जाच्या परतफेड करण्यासाठी
  • जुन्या गुंतवणूकदारांना बाहेर पडता यावे म्हणून उदाहरणार्थ एंजल इन्वेस्टर व्हेंचर कॅपिटल लिस्ट

केवळ मूळ कंपनी नव्हे तर एखाद्या कंपनीची प्रमोटर कंपनी तिची पालक कंपनी किंवा त्या कंपनीत गुंतवणूक केलेले कॅपिटल फंड्स देखील एखाद्या कंपनीचे साहित्य विक्रीसाठी आणू शकतात.

IPO सारखीच एक फॉलो ऑन पब्लिक ऑफर FPO देखील असते. FPO म्हणजे काय हे आपण पुढील लेखात वाचूया.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: