आड बाई आड गं Aad Bai Aad Ga

शेअर करा

आड बाई आड गं
सुपारीचं झाड गं

सुपारीला आल्या शेंगा
घाल ग पोरी पिंगा

एकीचा का दोघीचा
भार पडला चौघींचा

मामाची लेक गोरी
हळद लावा थोडी!

हळदीचा ऊंडा
रेशीम काठी गोंडा

रेशम काठी हालती
चिंचेखाली डुलती

चिंच बाई गोड गं
जिभेला आला फोड गं

फोड काही फुटेना
दारचा पाहूणा उठेना

जिभेचा फोड फूटला
दारचा पाहुणा उठला

सुपारीला आल्या शेंगा
धर गं पोरी पिंगा

शेअर करा

Leave a Reply

error: