गाई गाई

शेअर करा

गाई गाई, दूध दे
दूध दिले वासराला

वासरा वासरा बळ दे
बळ दिले नांगराला

नांगरा नांगरा फाळ दे
फाळ दिला जमिनीला

जमिनी जमिनी कस दे
कस दिला कणसाला

कणसा कणसा धान्य दे
पसा पसा धान्य घे

- राजा मंगळवेढेकर

शेअर करा

Leave a Reply

error: