sant_tukaram

वीट

शेअर करा

‘प्रभात, चा संत तुकाराम हा चित्रपट पाहून बऱ्याच जणांचे असे मत बनले आहे.  वारकरी संप्रदायात संत तुकारामांनी सदेह वैकुंठगमन केले अशी एक कथा आहे. जेंव्हा त्यांना घ्यायला विमान येते तेंव्हा ते आपल्या पत्नी जिजाऊ ला देखील विमानात बसून वैकुंठाला घेऊन जाऊ इच्छितात. परंतु अध्यात्माचे आणि परमार्थाचे महत्त्व न कळलेली जिजाऊ वैकुंठाला जाण्यास नकार देते अशी कथा काही कीर्तनकार सांगतात.  वारकरी संप्रदायातील व्यक्तींना जिजाऊ हे एक परमार्थाची जाणीव नसलेले पात्र वाटते. परंतु खरंच जिजाऊ अशा होत्या का?


शेअर करा

अंधाराला छेदण्याची गरज आहे

शेअर करा

सोशल मीडियावरील कचऱ्यात कधीकधी खूप चांगले हिरे-माणिक सापडतात. ही अशीच एक कविता नाना पाटेकर च्या नावावर आहे.  नाना या कवितेचा कवी आहे की नाही हे पक्के माहीत नाही. पण कविता मात्र छान आहे.  आवडली आहे म्हणून तुमच्या सोबत शेअर करतोय


शेअर करा
books

पुस्तकं

शेअर करा

पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की त्याच्या मुलाने/मुलीने देखील हा छंद जोपासावा. त्याने/तिने देखील पुस्तके वाचावी. त्यांनी पुस्तके का वाचावी याविषयी कवी सौमित्र याने खूप सुंदर कविता लिहून ठेवली आहे. एका अर्थाने पुस्तक वाचल्याने काय होते याविषयीचा सुंदर लेखच आहे हा. ही सुंदर कविता जाणकार वाचकांसाठी आणि कविता प्रेमींसाठी.


शेअर करा

किस्से वैज्ञानिकांचे

शेअर करा

वैज्ञानिकांचे जीवन प्रयोगशाळेत आणि प्रयोगशाळेबाहेर अनेक विस्मयकारक घटनांनी भरलेलं असतं. अशा घटनांचे किस्से तयार होतात. जितका वैज्ञानिक अधिक प्रसिद्ध तितके अधिक किस्से. त्यातून वैज्ञानिकांच मानवी स्वभावाचं, तंच बुद्धिमत्तेचं आणि मोठेपणाचं दर्शन घडत असतं. हे किस्से जसे गमतीदार असतात तसेच ते उद्बोधकही असतात. त्यामुळेच ते विज्ञानाच इतिहासाचा भाग बनून जातात. त्यातूनच त्यांचे महत्त्व अधोरेखित होतं. प्रसिद्ध वैज्ञानिकांच जीवनात घडलेले असे काही किस्से.


शेअर करा

माझा मराठवाडा

शेअर करा

मराठवाडा ही गौरवाने सांगण्याजोगा वारसा असणारी संतांची तशीच लढवय्यांची जमीन. विकासाची क्षमता असणारी जिद्दी माणसांची भूमी. पण आकांक्षा आहे महाराष्ट्राच्या गौरवात एकजीव होण्याची. मराठवाड्याचे निराळेपण संपावे ही. आणि खंत आहे याची की हे घडून येण्याऐवजी मराठवाडा या नावाने लढत राहणे आम्हांला भाग पाडले जात आहे याची. 


शेअर करा

शिवरायांचे आज्ञापत्र Shivaji Maharaj’s Vision of forest conservation and tree plantation

शेअर करा

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातील जंगल संपत्ती,निसर्ग संपत्ती कमी होऊ नये म्हणून एक आज्ञापत्रच काढले होते.आपल्या राज्यातील निसर्गदत्त जंगल संपत्तीची, वृक्षठेव्याची कशी काळजी घ्यावी, याविषयी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार स्पष्टपणे या आज्ञापत्रात मांडले आहेत.आधुनिक काळाप्रमाणे प्रदूषण किंवा पर्यावरणाचा असमतोल नसणाऱ्या त्यांच्या काळातही त्यांनी वृक्षसंपत्तीचे मोठेपण जाणून घेतले होते. गडावरील वृक्ष संवर्धनाबाबतच्या या आज्ञापत्रावरून त्यांची पर्यावरणाबाबतची दूरदृष्टी दिसून येते.


शेअर करा

Heroism and Fearlessness शौर्य व साहस

शेअर करा

एखादा जवान जेव्हा एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी आपला जीव धोक्यात घालतो किंवा एखाद्या अशा क्षणी तो झडप घेतो जेव्हा त्याला माहीत असते की यात आपला प्राण जाणार आहे तेव्हा अशा क्षणी त्याला हा निर्णय घ्यायला भाग पाडणारा विचार काय असतो?

भगवद्गीतेत सांगितलेले
‘हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्’
हे तत्वज्ञान त्याच्या मनात असते की इतर कुठली प्रेरणा? हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला सांगता येणार नाही.
हे तोच सांगू शकेल जो या चक्रव्यूहामध्ये शिरला आहे. अनेक वेळा….. अनेक प्रसंगी….


शेअर करा
marathi_shala

मराठी शाळा जिंदाबाद Education in marathi medium or english medium?

शेअर करा

खाजगी शाळांच्या मनमानी आणि पैसे ओरबाडण्याच्या वृत्तीला कंटाळून प्रशांत मोदी या पालकाने मागील वर्षी साताऱ्यातील एका नामवंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून मुलाला काढून साताऱ्यातीलच जिल्हापरिषदेच्या श्री प्रतापसिंह हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला. त्याविषयीचे त्यांचे मनोगत


शेअर करा

5. इंदिरा गांधी आरोपीच्या पिंजऱ्यात Indira Gandhis Statement and Cross examination in Allahabad High court

शेअर करा

जेव्हा इंदिरा गांधी साक्षीदार म्हणून येण्याचे ठरले तेंव्हा हा खटला एकदम प्रकाश झोतात आला. प्रसार माध्यमांची उत्सुकता शिगेला पोचली. देशाच्या इतिहासात तोपर्यंत कधीही पंतप्रधान पदासारख्या अत्यंत महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती साक्षीदार म्हणून कुठल्याही कोर्टासमोर उभा राहिला नव्हता


शेअर करा

4. निळी पुस्तिका आणि विशेषाधिकार BLUE BOOK and State Privileges

शेअर करा

इंदिरा गांधींनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला की नाही हे ठरवण्यासाठी ही कागदपत्रे महत्वाची आहेत असे श्री  शांतीभूषण यांना वाटत होते. सरकारने असे करण्यास नकार दिला.  कारण सांगितले की ही कागदपत्रे द्यावी की नाहीत  यासंबंधी राज्याला (state) काही विशेष अधिकार (Privileges) आहेत. ज्या कागदपत्रांची मागणी राजनारायण यांचा पक्ष करत होता त्याला नाव होते ब्लू बुक (BLUE BOOK).  आणि त्यामध्ये पंतप्रधान प्रवासात किंवा दौऱ्यावर असताना त्यांच्या संरक्षणासाठीचे नियम आणि मार्गदर्शक सूचना समाविष्ट होत्या. या पुस्तिकेत असे नमूद होते की पंतप्रधान दौऱ्यावर असताना संबंधित राज्याने त्यांच्या संरक्षणाचा आणि त्यांच्या बैठका आणि सभांची व्यवस्था  करायची. या व्यवस्थेचा खर्च देखील ज्या राज्यात हा दौरा आहे त्या राज्याने करायचा. पंडित जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री पंतप्रधान पदावर असेपर्यंत असाच दंडक होता.


शेअर करा
error: