Author name: Prashant G

कोहिनूर हिरा आणि दिल्लीतील भीषण कत्तल

शेअर करा

नादिरशहा अक्षरश चवताळला. नादिरशहा ने इतिहासात कुप्रसिध्द असलेली ‘दिल्लीची कत्तल’ घडवून आणली. त्याने आपल्या सैन्यास दिल्लीत सरसकट कत्तल करण्याचा हुकूम दिला. तो 22 मार्च 1739 ला सुनहरी मशिदीत आला. नगारे आणि तुतारींच्या घोषात त्याने आपल्या सैनिकांसमोर आपली तलवार म्यानातून बाहेर काढून हवेत उंच धरली. सैनिकांसाठी हा कत्ल-ए-आम चा आदेश होता. हजारो शस्त्रधारी सैनिक रस्त्यावर उतरले आणि दिसेल त्याची कत्तल करत सुटले. हजारो निष्पाप नागरिक यात मारल्या गेले. प्रचंड प्रमाणात मालमत्तेची जाळपोळ आणि नासधूस झाली. दिल्ली अक्षरशः बेचिराख करण्यात आली. दिल्लीचा बादशाह मोहम्मद शाह रंगीला याला अक्षरशः जीवाची भीक मागावी लागली. काही तासांनी जेंव्हा नादीर ने पुन्हा आपली तलवार म्यान केली तेंव्हाच ही कत्तल थांबली. असे म्हणतात की दिल्ली सतत 57 दिवस जळत होती. एका अंदाजानुसार, काही तासातच सुमारे 20 ते 30 हजार बायका पुरुष आणि लहान मुलेदेखील या कत्तलीत मारल्या गेली. जवळ जवळ 10 हजार बायका पोरांना गुलाम करण्यात आले.


शेअर करा

केशाने आज कंपनीचे नाव राखले

शेअर करा

शनिवार उजाडला. रात्री दहाला खेळ सुरू झाला. पडदा उचलला गेला. नाचणाऱ्या वल्लरीच्या ऐवजी, शांत आणि संयमी शारदेच्या रुपात केशवचे स्टेजवर आगमन झाले. केशवचा प्रवेश एवढी प्रभावशाली होती की ते टाळ्यांच्या कडकडाट झाला. नाटक उत्तरोत्तर रंगत गेले. प्रत्येकाने जीव ओतून काम केले. केशवने गायलेल्या प्रत्येक गाण्यासाठी ‘वन्स मोअर’’ आला. विशेषतः ‘मूर्तिमंत भीती उभी’ या हे पद तर इतके रंगले की त्याला सलग, सहा वेळा ‘वन्स मोअर’ मिळाला.

परंतु, यामुळे बारा वर्षाचा केशव थकून गेला. पहिलाच दिवस आणि इतके गायन. थकवा अपरिहार्य होता. शेवटी व्यवस्थापक म्हैसकर स्टेजवर आले आणि त्यांनी केशवच्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करावा अशी सर्वांना विनंती केली.

“एक शेवटचा वन्स मोअर रे म्हैसकर!” शाहू महाराजांनी त्यांच्या आसनावरून ओरडले. केशव गायला. महाराज आणि सभागृह मंत्रमुग्ध झाले.


शेअर करा

गदर – एक खरी खुरी प्रेम कथा Gadar a true love story

शेअर करा

खरी स्टोरी अशी आहे की इसवी सन 1947 ला फाळणी झाली.. त्यावेळेस हजारो कुटुंबं भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये विस्थापित झाली किंवा दंगलीमध्ये बळी पडली. फाळणीच्या या अंदाधुंदी मध्ये झैनाब नावाची पूर्व पाकिस्तान मधील जालंदर जिल्ह्यामधील एक मुलगी भारतात अडकते. दंगलीमध्ये तिचा जीव जाणार होता. परंतु बुटा सिंग नावाचा सरदार तिला बघतो आणि तिचा जीव  वाचवतो. तिला आपल्या घरी घेऊन येतो. पुढे दोघांमध्ये प्रेम बहरते. बुटा सिंग झैनाबशी लग्न देखील करतो. त्यांना दोन मुली होतात. परंतु हे प्रेम जणू नियतीला मान्य नव्हते. 


शेअर करा

Mama Shree मामाश्री

शेअर करा

मामांश्रींशी आमची पहिली ओळख आणि भेट तशी पाटील कॉलनीतच झाली. (खरं तर ते माझे काकाश्री. पण शिंदे परिवारातील सगळे मामाश्री म्हणायचे म्हणून मी देखील मामाश्री म्हणतो.) नंतर उस्मानपुऱ्यात होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमात, निवांतपणे होणाऱ्या भेटींमध्ये मग मामाश्री हळू हळू समजायला लागले. वयस्कर पण शरीरावर वयाचा प्रभाव न जाणवू देणारी अंगकाठी, साधी पण समोरच्याच्या अंतःकरणात उतरून ठाव …

Mama Shree मामाश्री Read More »


शेअर करा

Chandrabhga Aaji चंद्रभागा आजी

शेअर करा

कधी कधी मला वाटतं की आजीचं आयुष्य म्हणजे जणू काही संत तुकारामाच्या अवलीचे प्राक्तन. संत तुकारामाच्या आवलीचं जसं झालं तसंच आजीच्याही वाट्याला आलं. काय म्हणून केलं नाही तिने तुकोबांसाठी? या आवलीने देवभक्तीत रंगलेल्या, घर-संसार विसरलेल्या तुकारामाची संसाराची सगळी आघाडी सांभाळली. भांडाऱ्याच्या डोंगरात काटे कुटे तुडवीत तुक्याच्या भुकेची भाकर झाली. महिनोन्महिने नामस्मरणात दंग तुकोबांचा संसार सांभाळला. पोराबळांचे सर्व काही पाहिले. तुकाराम महाराज वारीला गेल्यावर त्यांच्या येण्याची वाट पहात सर्व कर्तव्ये पार पाडली. आलेल्या संतमंडळींना कोंड्याचा मांडा करून खाऊ घातले. अडचण असून देखील नवऱ्या साठी मावंदे देखील घातले. गाभण जनावरांची आई झाली. एवढेच काय त्यांच्यासाठी वैकुंठाचा मोह टाळला. सर्वांना तिचा राग दिसला पण त्याग मात्र दिसला नाही. तुकाराम संत बनून सर्वांच्या नमस्कारास पात्र झाले. पण आवली मात्र उपेक्षितच राहिली. तुझीही कहाणी काहीशी अशीच आहे आजी. तूझ नाव चंद्रभागा. विठुरायाच्या गजरात चंद्रभागेच्या वाळवंटाकडे कुणाचं लक्षच गेलं नाही आजी.


शेअर करा
Yashawant vyakhyanmala ambad vakte

मी कसा घडलो

शेअर करा

अंबड शहरांमध्ये 2011 सालापासून काही होतकरू तरुणांचा एक चांगला गट दरवर्षी यशवंत व्याख्यानमालेचे आयोजन करतो. या वर्षी 2020 साली या व्याख्यान माले ने आपले दहावी पुष्प गुंफले. मराठवाड्यामधील ग्रामीण भागात आणि अंबड सारख्या शहरात तरुणांनी दहा वर्ष एक उत्कृष्ट व्याख्यानमाला सुरू करणे आणि ती दहा वर्षे यशस्वीपणे राबवणे हे मला वाटतं त्यांच्या कामाची आणि यशाची पावती आहे. पद्मश्री रवींद्र कोल्हे, सुपर थर्टी चे जनक प्रा. आनंद कुमार, हनुमंतराव गायकवाड, साहित्यिक डॉ. रा. र. बोराडे आणि डॉ. उत्तम कांबळे, विधिज्ञ असीम सरोदे, मुक्ता दाभोळकर अशांसारख्या दिग्गज वक्त्यांना बोलावून त्यांनी अंबड सारख्या मराठवाड्यातल्या आमचा भागांमध्ये हा ज्ञानाचा वटवृक्ष रुजवला. अशा या व्याख्यानमाले मध्ये 2012 साली मी युपीएससी स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर मला व्याख्यानाचे पुष्प गुंफण्याची संधी मिळाली. यशवंत व्याख्यानमाले ने दशकपूर्ती चा मुहूर्त साधून व्याख्यान माले मध्ये ज्यांचे ज्यांचे व्याख्यान झाले त्यांच्या व्याख्यानांची एक स्मरणिका काढली. माझे व्याख्यान ध्वनिमुद्रित केलेले नसल्यामुळे मला माझे व्याख्यान पुन्हा लिहून काढण्याचे विनंती करण्यात आली. व्याख्यानमालेत व्याख्यान देऊन दहा वर्ष झाल्यानंतर मला ही विनंती ती करण्यात आली होती. त्यामुळे मी त्या विषयावर जे काही बोललो होतो ते जसे आठवले तसे थोडक्यात लिहून काढले आहे. हा लेख त्या स्मरणिकेत प्रकाशित करण्यात आलेला आहे. तोच लेख मी आज इथे तुमच्यासोबत शेअर करतो आहे.


शेअर करा
error: