शक्ति और क्षमा shakti aur kshama

रामधारी सिंह दिनकर यांची शक्ती आणि क्षमा नावाचे सुप्रसिद्ध कविता आहे ही कविता त्यांच्या कुरुक्षेत्र या काव्यातून घेण्यात आलेली आहे.      यामध्ये प्रसंग असा आहे कि महाभारताचे युद्ध संपल्यानंतर युधिष्ठीर आणि सर्व पांडव शरपंजरी पडलेल्या भीष्मपितामह यांना भेटण्यासाठी जातात. महाभारत युद्धाविषयी युधिष्ठिराला प्रामाणिक खंत असते. तो ती भीष्म पितामह जवळ व्यक्त करतो. युधिष्ठिराचे मन युद्धाने उद्विग्न झालेले असते . त्याला प्रामाणिकपणे वाटत असते  की या प्रचंड नरसंहाराला तोच जबाबदार आहे. त्याने जर मनात आणले असते तर तो हे युद्ध थांबू शकला असता. युधिष्ठिराला वाटते की एवढ्या सर्व बांधवांना आणि क्षत्रियांना मारून मिळवलेला हा विजय रक्तलांछित आहे, कलंकित आहे. त्यामुळे न महाभारताच्या विजयाला अर्थ आहे, न त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या राजसत्तेला. पश्चातापाने दग्ध होऊन युधिष्टिर हे जाहीर करतो की त्याची जगण्याची देखील इच्छा राहिलेली नाही.   

पण येथे भीष्मांमधील खरा राजकारणी, नीतिज्ञ आणि खरा क्षत्रिय आपल्यासमोर रामधारी सिंह दिनकर उभा करतात. भीष्म पितामह युधिष्ठिराला तत्कालीन परिस्थिती आणि युद्धाची अपरिहार्यता लक्षात आणून देतात. त्याच सोबत खर्‍या-खोट्या मधील, सद्गुण दुर्गुण यामधील लढा कसा आदिम आहे अनंत आहे हे देखील त्यास समजावून सांगतात. या काव्यामध्ये तिसऱ्या सर्गा मध्ये भीष्मपितामह युधिष्ठिराला बल शक्ती आणि पराक्रमाची महती एखाद्या राजासाठी, राज्यासाठी आणि राज्य करण्यासाठी कशी आवश्यक आहे हीदेखील वेगवेगळ्या उदाहरणांच्या आधारे पटवून देतात. हे मार्गदर्शन जेवढे राजाला उपयुक्त आहे तेवढेच एक व्यक्तीसाठीदेखील हा सल्ला मोलाचा आहे.   

भीष्मपितामह युधिष्ठिराला समजून सांगतात की हे युधिष्ठिर, सद्गुण तर माणसाला माणसाला हवेच परंतु त्यासोबत माणसाकडे बल, शक्ती आणि पराक्रम सुद्धा हवे. नाहीतर अशा व्यक्तीच्या सदगुणांना काहीही अर्थ राहत नाही. अशा व्यक्तीच्या सद्गुणांचा त्याला स्वतःला लाभ होतो ना इतरांना लाभ होतो. क्षमा तसा महान पुरुषांचा गुण आहे. परंतु शक्तीहीन व्यक्तीच्या क्षमेलाही काही अर्थ नसतो.     

तिसऱ्या सर्गा मधील असा हा प्रसिद्ध काव्यांश आपल्यासाठी इथे प्रसिद्ध करतो आहे. यातील ठळक अक्षरात (bold font) असलेल्या काही ओळी तर अक्षरशः सुभाषितांच्या दर्जाच्या आहेत.

क्षमा, दया, तप, त्याग, मनोबल 
सबका लिया सहारा
पर नर व्याघ सुयोधन तुमसे
कहो कहाँ कब हारा?

क्षमाशील हो रिपु-सक्षम
तुम हुये विनत जितना ही
दुष्ट कौरवों ने तुमको
कायर समझा उतना ही

अत्याचार सहन करने का
कुफल यही होता है
पौरुष का आतंक मनुज
कोमल होकर खोता है

क्षमा शोभती उस भुजंग को
जिसके पास गरल हो 
उसका क्या जो दंतहीन
विषरहित विनीत सरल हो 

तीन दिवस तक पंथ मांगते
रघुपति सिंधु किनारे
बैठे पढते रहे छन्द
अनुनय के प्यारे प्यारे

उत्तर में जब एक नाद भी
उठा नहीं सागर से
उठी अधीर धधक पौरुष की
आग राम के शर से।

सिंधु देह धर त्राहि-त्राहि
करता आ गिरा शरण में
चरण पूज दासता गृहण की
बंधा मूढ़ बन्धन में

सच पूछो तो शर में ही
बसती है दीप्ति विनय की
संधिवचन सम्पूज्य उसी का
जिसमे शक्ति विजय की

सहनशीलता, क्षमा, दया को
तभी पूजता जग है
बल का दर्प चमकता उसके
पीछे जब जगमग है 

– रामधारीसिंह ‘दिनकर’
– ‘रश्मीरथी’  
काव्यसंग्रहातून साभार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: