मी, आपण कोण आहोत खरोखर? अनेक जणांनी या आदिम प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. अनेकांना आपले उत्तर सापडले देखील. असेच एक साधे सरल उत्तर या कवितेतही आहे. सुरुवात जरी नेती-नेती च्या सुरात तू ही नाहीस तू ते नाहीस अशी असली…
एखादा जवान जेव्हा एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी आपला जीव धोक्यात घालतो किंवा एखाद्या अशा क्षणी तो झडप घेतो जेव्हा त्याला माहीत असते की यात आपला प्राण जाणार आहे तेव्हा अशा क्षणी त्याला हा निर्णय घ्यायला भाग पाडणारा विचार काय असतो? भगवद्गीतेत…
मराठवाडा ही गौरवाने सांगण्याजोगा वारसा असणारी संतांची तशीच लढवय्यांची जमीन. विकासाची क्षमता असणारी जिद्दी माणसांची भूमी. पण आकांक्षा आहे महाराष्ट्राच्या गौरवात एकजीव होण्याची. मराठवाड्याचे निराळेपण संपावे ही. आणि खंत आहे याची की हे घडून येण्याऐवजी मराठवाडा या नावाने लढत राहणे आम्हांला…