Story of missed IT revolution अर्थात भारतीय संगणक क्रांतीचा इतिहास

शेअर करा

एक संगणक अनेक जणांच्या रोजगार हिसकावून घेईल अशी भीती त्यांना वाटत होती. बाहेरच्यांनीच नव्हे तर खुद्द काँग्रेस पक्षांमध्ये देखील राजीव गांधीला या बाबतीत विरोध सुरु झाला. पाठीमागे कुजबुज सुरु झाली. बुजुर्ग नेते नाराज झाले. जुने  ढुड्ढाचार्य (old guards)  विरोध करू लागले.  हे धोरण समाजवादी चेहरा  असलेल्या काँग्रेसला परवडणार नाही. आणि याचा परिणाम कामगार वर्गांच्या पाठिंब्यावर होईल असे कारण ते पुढे करत. एवढेच काय तर शासकीय प्रयत्नाने ECIL मध्ये तसेच काही खाजगी कंपन्यांच्या प्रयत्न यामुळे आकाराला येत असलेल्या या उद्योगाला अडथळा कसा आणता येईल याचे प्रयत्न झाले. खुद्द काँग्रेसमध्येच या उद्योगाला “स्क्रू ड्रायव्हर इंडस्ट्री” नावाने हिणवले जात असे.


शेअर करा