द्वारके प्रदेसी एकी गांवीं श्राध : बाइला खीरि नीवों घातली होति : नीवों घालीतां पोळली : आणि तोंडी आंगुळीया घातलीया : गोसावी हास्य करूनि श्रीमुखीं आंगुळी घातली : तें माहाजनी पूसीलें : “राउळो : ऐसें काइ? ” गोसावी म्हणीतलें : “बाइला खीरी नीवों घातली होती : ते पोळली :” माहाजनी तोचि दीसू तोचि मासू लीहोनि पाठवीलें : तवं तिया बाइला म्हणीतलें : “साच : तेधवां श्रीचांगदेओराउळ गोसावी येथ होते :” आवघेयां आश्चर्ये जालें :॥