२७ चर्मकारां स्तीति

बीडाजवळि कव्हणी एकु गावु : तेथ गोसावीं बीजें केलें : पव्हेसि गोसावीयांसि आसन जालें : चर्मकारू’ आणि चर्मकारी’ दोघे हाटासि गेली होती : हाटुनि एतें होती : तवं चर्मकारू तान्हैला : तो पव्हेसि पाणी पेयावेयासि आला : तवं गोसावीयांतें बैसलेयां देखिले : आला : दंडवत केलें : श्रीचरणां लागौनि गोसावीयांपासि पुढां बैसला : पुडवांटुवा काढिला : पोफळफोडणेनि फोडी केलीया : गोसावीयांसि फोडी ओळगविलीया : आपण वीडीया करूनि दीधलीया : तवं मागिलीकडौनि चामारि आली : तीसिहीं वीडा दीधला : आपणही घेतला : तवं तीया म्हणीतलें : “उठि गा : चाल जाओं: सांगातु गेला :” तेही म्हणीतलें : “नावेक पारूख :” मागुतें तीया म्हणीतलें : “उठि गा चाल : लोकू दूरि पावला : माणुसांची नीहारि जाली : गोरूवें गावांकडे नीगाली : वीळु जाला : कोण्हाकरवि काइ धोंगडा हीरौं पातासि? उठि गा चाल :” तेणें म्हणीतलें : ‘पारूख पारूख : नावेक :” ऐसे वेळां दोनि तीनि : तीया म्हणीतलें : परि तो नुठिचि मागोतें तीयां म्हणीतलें : “हां गा : तरि काइ तुं नैयेसि? ना नैएं : ” “तरी मी : जाओं?” “ना जाए :” पैलू ठावोवरि गेली : आणि मागौती आली : मग म्हणीतलें : “कां गा : तुं नैएसि : तरि फेडि माझीये माथांचा हातु” तेही म्हणीतलें : “फेडिला : जाए :” तीयां म्हणीतलें : “तरि कवण साक्ष?” “; ‘ना हे राउळ साक्ष :” तीया म्हणीतलें : “राउळो २: तुम्हीं साक्ष?” गोसावीं श्रीमुगुटें३ अनुकारू केला : इतुकेनि ते नीगाली : गोसावीं तांबोळ प्रत्यजूं आदरिलें : आणि तेण्हें दोन्ही हात ओडविले : श्रीमुखीचें तांबोळ घेतलें : तांबोळाचा प्रसादु घेतला : आणि तेयासि स्तीति जाली : तैसेंचि गोसावीं तेथौनि बीजें केलें : मग सर्वज्ञ म्हणीतलें : “ते खोलनायिकाचेया आंबेयासि आले : तेथ इस्वरपुरूख होउनि खेळत असति : इस्वरत्वें वर्तो लागला : तेयांतें इस्वरत्वें लोकु मानू लागला : घरोघरी न्हाणीति : उटीति : चंदनपुजा : धुपारतीया : मंगळारतीया : आडवाटी ठाणवै जेवण : बाजां सुपवतीयांवरि नीद्रा करीति : ऐसें सपुजीत एकाचां घरीं जेउं बैसले” असति सर्वांगीं चंदनाची भोरी : लल्हाटी आडा : गळां पुष्पांचीया माळा : आरतीया निंबलोणें होतें असति : तवं तेयांचीए गावींचा चाम्हारू हाटासि आला होता : तेणें म्हणीतलें : ‘अमुका तमुका चामारू तो तुं नव्हसि?’ तवं तेथ ब्राम्हण असति : तेही म्हणीतलें : ‘हा कवणु?’ तेणें म्हणीतलें : ‘ना हा आमचीए गावीचा चामारू : आमचा गोतीया : याची मायबापें यातें पाहातु असति ५ : ब्राम्हणी म्हणीतलें : ‘ऐसे? ऐया रे : कैसा लोकु वीटाळिला :’ ऐसे एरें आइकिलें : आणिकी आइकिलें : ऐसे जगळदेयावींझदेयाचा ठावो पावले : जगळदेवो वींझदेवो ते तेथिचे अधीकारीये : तेयांपासी अवघे माहाजन आले : तेयांपुढे सांघीतलें :जें ‘हा चामारू : एणे अवघा गावू वीटाळिला : ऐसेयासि काइ कीजे? ‘ मग तेहीं नीबंधकार ब्राम्हण बोलाविले : तेयांतें पुसिलें : ‘हा चामारू : एणे अवघा गावू वीटाळिला : तरि ऐसेयासि काइ कीजे?’ मग तेहीं नीबंध काढिले : नीबंधी पाहिलें : तवं नीबंधी ऐसें नीगालें : जे ‘हे चुनखडेयाआंतु दाटिजति :’ तैसीचि तेहीं खांच खणविली : तेथ तेयांतें बैसविलें : वरि चुनखडे ताउनि घातले : तेयावरि पाखाला रीचवीलियाः केतुली एकि मांदी मीनली होती : तवं एकू हाटवटीएहुनि आला : तेणें ते मांदी देखिली : मग तेयांतें पुसिलें : ‘हां गा : हे मांदी काइसी ?’ तेही म्हणीतलें : ‘तुम्ही नेणा?’ ‘ना : नेणों :’ ना एथें जे इस्वरपुरूखू होउनि खेळत होते ते चामार जाले : तेणे अवघा गावू वीटाळिला : तो खडेयांआंतु बसविला :’ तेणें म्हणीतलें : ‘आरे : खडेयांतु कैसें बैसवीलें ? ते तवं हाटवटीये खेळत असति : जा पां पाहा:’ मग आवघे हाटवटीएसि आले : तवं तैसेंचि सपुजीत खेळत असति : देखिले१६ : सर्वांगीं चंदन : लल्हाटी चंदनाचा आडा : गंधाक्षता : गळां गळदंडे : पुष्पांचीया माळा :” सर्वतें म्हणीतलें : “गळांचा गळदंडा आदिकरूनि कोमाइजेचि ना : ना पुजा वीखुरेची ना : मग ते आवघे अनुतापले : दंडवतें घातली : ‘जी जी : आम्ही पापीए चांडाळु : तुम्हांसि आम्ही खस्ता केली.’ मग ते तेथौनि नीगाले:” मग माहादाइसीं पुसिलें : “जी जी : एसणे तेही तेयांसि केलें तरि तेयांसि काइ जालें?” सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइ तेयाचा नीर्वसु जाला : ” ॥

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: