ओरंगळ प्रदेशी’ एकी गावी गोसावीयांसि अवस्थान’ : गोसावी’ नगराआंतु पाणिपात्र केलें : तळां आरोगण केली : पाळी पींपळ : तेथ आसन जालें : तवं ब्राम्हणु एक संध्यावंदनासि आले : संध्या केली : गोसावीयांतें देखिलें : मग गोसावीयांसि दंडवत केलें : श्रीचरणासि लागले : मग म्हणीतलें : “जी जी : गोसावीयांसि बीढार कोणी ठाइं?” सर्वतें म्हणीतलें : “आतां कीजैल : मग गोसावीयांसि आरोगणे वीनविलें: गोसावीयांसि बीजें करावयाची प्रवृति : मां गोसावीं तेयांची वीनवणी स्वीकरिली : तेयाचेया घरासि बीजें केलें : तीही गोसावियांसि आसन घातलें : श्रीचरणप्रक्षाळण केलें : मग बहीणीतें तेणें म्हणीतलें : “ए ए : गोसावीयांसि दंडवत घाली :” तीएं दंडवतासि आली : गोसावीयांसि दंडवत केलें : मग ताट केलें : आरोगण जाली : गुळुळा जाला : वीडा जाला : मग तेणें ब्राम्हणें गोसावीयांतें वीनवीलें : “जी जी : गोसावी जवं एथ असती तवं गोसावीं एथचि आरोगण करावी : उपरीयेवरि पहुडु स्वीकरावा जी : माझी बहीणि गोसावीयांची सेवा करील :” गोसावीयांसि प्रवृति : गोसावीं तेयाची’ वीनवणी स्वीकरिली : मां तेणें आपुलीए बहिणीतें म्हणीतलें : “आवो : तुआं गोसावीयांची बरवी सेवासुस्रुका करावी :” मग उपरीयेवरि गोसावीयांसि अवस्थान जालें : पहुडु जाला : तेयांची बहीणि गोसावीयांची सेवासुस्रुका करीति : गोसावी तेथ राज्य करूं लागले : गोसावी उदीयांचि वीहरणा बीजें करीति : तवं तीए गोसावीयांकारणे उपाहारू नीफजवीति : आसन घालुनि गोसावीयांची वाट पाहातें असति : मग गोसावी विहरणौनि बीजें करीति : आसनी उपवीष्ट होति : तीयें गोसावीयांचे श्रीचरण प्रक्षाळीति : पुजा करीति : ताट करीति : आरोगण होए : गुळुळा होए : वीडा ओळगवीति : मां पहुडु होए : तीए झडकरी चरणसह्वान करीति : गोसावीयांसि नीद्रा ए : मग आपण जेवीति : ऐसें बहुत एक दीस राज्य केलें : धाकुटीचि गोसावीयांची श्रीमुर्ति : धाकुटीचि ते बाइको : लोकाचां ठाइं अनकुळता : प्रतिकुळता : उदासीनता : ऐसें तीन्हीं ठाए गोसावीं स्वीकरिले : लोकें अन्यथाज्ञान भाउं आदरिलें : प्रतीकुळु लोकु तो काही काही जनअपवादु बोलों लागला : मग तो आइके : ऐसां तेयाची सोइरीधाइरी म्हणति : “हे गोसावी धाकुटे : हेही धाकुटी : एथ काहीं ऐसेंनि ऐसें असे :” ते हळुहळु तेणें आइकिलें : मग तेयापुढां तेयाचेया तोंडावरि बोलति : तेणें म्हणीतलें : “हे साच की लटिकें ? आपुलां डोळां देखैन : तेधवां साच : आणि काइ :” म्हणौनि तेणें पाहों आदरिलें : बहीणीतें म्हणीतलें : “सीदौरि करि हो : मी गावां एका जाइन :” म्हणौनि गावां गेला : मागौता आला : ऐसें म्हणौनि जाळारखें पाहावेया राहिला : तवं गोसावीं पहुडु स्वीकरिला असे : तीए° गोसावीयांचे चरणसह्वान करितें होती : तैसींचि गोसावीयांसि नीद्रा आली : तीएं श्रीचरणांवरि माथा ठेउनि नीजैली होती : “हे नव्हे : काहीं उनखुन चुकली : मा हे रुसैले असति :
हे बुझावीत” असे २ : गोसावी विनती स्वीकरीति ना : गोसावी ऐसें करिताति १३ : ऐसें म्हणौनि खर्ग काढुनि आले : आणि गोसावीं श्रीमुगटावरीलु पदरू श्रीकरें ऐसा करूनि फेडिला: तेयातें कृपादृष्टी अवळोकुनि दुसरें प्रेम : उतम साधन होतें तें संचरीलें : प्रेमसंचारमात्रें” वीकारू वीकल्पु : स्वभावो : तीन्ही उछेदौनि गेले: हातिचें खर्ग उसळौनि पहां पडिलें : मग तैसेंचि गोसावीं तेथौनि बीजें केलें : सरीसें भगतही नीगाले : ॥
” . ऐलाडि पैलाडि गावं : गोसावीं येका गावां बीजें केलें : एकी गावीं गोसावीं तेयांतें म्हणीतलें : “भटो” : हें पैला गावीं असैल : मासापाखा हें तुम्हां दर्शन देइल : “हो कां जी : ” ऐसें म्हणौनि भगतातें राहाविलें : ते तीए गावीं राहीले : आपण गोसावीं तेया गावां बीजें केलें : तीए गावीं गोसावीयांसि अवस्थान जालें : तेथौनि भगताचेया गावांसि ब्राम्हणु एकु प्रतदीनीं कणवृतीसि ए : भगत तीए गाविची सीवंवहीं” एति : मग तेयांतें पुसति : “हां भटो : यां गावीं एक पुरूख असति की ? गुजरूवेखू : गौरवर्ण श्रीमुर्ति : लंबकर्ण : वीसाळनेत्र : अजानबाहु : बतीसलक्षण : कटिप्रदेसीं एकु सुडा: श्रीमुगुटावरि एकु सुडा: श्रीकरी आंजुळी पाणीपात्र : ऐसे गोसावी “नीकेनि असति ?” तीए गावीं राज्य करीत असति कीं ?” तो म्हणे: “हो असति : ‘ “ना नीकेनि असति : ” मग दुख करीति : “तेयां कैसा अवसरू असे ?” “ना ऐसा ऐसा असे :” ऐसें ते दीसवड नीच पुसति: ऐसां एकु दीं तीं ब्राम्हणीं म्हणीतलें : “काइ पां : अस्त्रीयांसि पुरूखांचा वेधू: पुरूखांसि स्त्रीएचा ” वेधू: पुरुखांसि पुरूखांचा एसणा वेधू काइसा पां?” एकु दीं भगतीं ब्राम्हणातें पुसिलें: तवं तेहीं तेयांतें म्हणीतलें : “तें तुम्ही नेणां ? ” भगतीं म्हणीतलें : कैसें ?” ‘ना तें ऐसेनि ऐसें वर्तलें : सर्पनीमीत्यें ऐसें उमटवीलें : भगतीं म्हणीतलें : “हां भटो : हें सत्य ?” “ना सत्य : (6 *) ([ }} 33 66 सत्य ? (1 ‘ना सत्य : ” ऐसें त्रीसुधी पुसिलें : तेहीं त्रीसुधी तैसेंचि म्हणीतलें : आणि दडैकरि पडिले : देह वीसर्जलें : तेणें ब्राम्हणें म्हणीतलें : “आहा : मीयां ओखटें केलें :” ना म्हणौनि : तैसाचि तो ब्राम्हणु बिहाला : “आरे : ओखटें जालें : आतां काइ करीन ? ” म्हणौनि गोसावीयांपासि सांघावेया आला : मां मागील वृतांत आवघे गोसावीयांपुढां सांघीतलें : सर्वज्ञे म्हणीतलें : “आहा : ओखटें केलें : हां भटो : ऐसा सत्यहि अर्थ न बोलीजे : मां एसणें असत्य तुम्हांसि कैसें बोलवलें ? आणि आतां कवणी माएचां पोटीं रीगाल ? ” ||
” मग गोसावीं तेयांतें पुसिलें: “भटो : तुमतें कुदळीपाउडे असे ?” तीहीं म्हणीतलें : “जी जी : ” “जा : घेउनि या : गेले : कुदळीपाउडें घेउनि आले : गोसावीं तेथ बीजें केलें : गोसावीं तेयांतें श्रीकरें स्परीसिलें: मां गोसावी तेयातें श्रीदोंदेंसी धरुनि : आसन जालें : मग तेया ब्राम्हणाकरवि खांच खणविली : रीगौनि पाहिली : मग मानेकडे गोसावीं धरिलें : पायांकडे तेहीं ब्राम्हणीं धरिलें : मां भगताचा नीक्षेपु केला : मग सर्वज्ञे म्हणीतलें : “बाइ : यासि तेथ घडीभरि असवेंचि ना : मग हें तेथौनि नीगालें