२७ चर्मकारां स्तीति
बीडाजवळि कव्हणी एकु गावु : तेथ गोसावीं बीजें केलें : पव्हेसि गोसावीयांसि आसन जालें : चर्मकारू’ आणि चर्मकारी’ दोघे हाटासि गेली होती : हाटुनि एतें होती : तवं चर्मकारू तान्हैला : तो पव्हेसि पाणी पेयावेयासि आला : तवं गोसावीयांतें बैसलेयां देखिले : आला : दंडवत केलें : श्रीचरणां लागौनि गोसावीयांपासि पुढां बैसला : पुडवांटुवा काढिला …
२७ चर्मकारां स्तीति Read More »