महानुभाव

२७ चर्मकारां स्तीति

शेअर करा

बीडाजवळि कव्हणी एकु गावु : तेथ गोसावीं बीजें केलें : पव्हेसि गोसावीयांसि आसन जालें : चर्मकारू’ आणि चर्मकारी’ दोघे हाटासि गेली होती : हाटुनि एतें होती : तवं चर्मकारू तान्हैला : तो पव्हेसि पाणी पेयावेयासि आला : तवं गोसावीयांतें बैसलेयां देखिले : आला : दंडवत केलें : श्रीचरणां लागौनि गोसावीयांपासि पुढां बैसला : पुडवांटुवा काढिला …

२७ चर्मकारां स्तीति Read More »


शेअर करा

२६ अंध्रदेसी तेलिकारा भेटि

शेअर करा

सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइ : हे अंध्रदेसीं होतें : एका गावां गेलें : तेलिकार एक सीवभगत : ते पाहातपटीं उठीति : झुंझुरकां गंगेसि जाति : गुळुळा करीति : पाए धूति : टीळा लावीति : लींगपुजा करीति : धूपार्ती करीति : मग आपुला व्यापारू करूं लागति : एकु दी पाहातपटींचि उठीले : नदी गेले : तेयाची …

२६ अंध्रदेसी तेलिकारा भेटि Read More »


शेअर करा
shri chakradhar swami

२५. कांतीये श्रीचांगदेवोराउळांसीक्षां भेटि

शेअर करा

गोसावीं दादोसांतें म्हणीतलें : “माहात्मे हो : तुम्हीं श्रीप्रभूचेया दरीसना कां जा?” तवं दादोसी म्हणीतले : “ना जी : ते आमचे परमगुरू असति म्हणौनि जाओं :” सर्वज्ञ म्हणीतलें : “ ते वानरेयांचे परमगुरू : तुमचे परमगुरू ते कांतीयेसि असति :” माहादाइसी पूसिलें : “ते कैसे जी?” यावरि हे गोष्टि सांघीतली : सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइ …

२५. कांतीये श्रीचांगदेवोराउळांसीक्षां भेटि Read More »


शेअर करा

२४ बोल्हा बारीया स्तीती

शेअर करा

बोल्हा तो बारी : तो कंदांमुळां’ गेला होता : तेयांसि गोसावीयांचे दरीसन जालें : मग तो मुगुताबाइया बोळवीतु पाठवीला : तो बोळवीतु नीगाला : तेणें श्रीमूर्तिचे कांटे फेडिले : पोतुकें भीजवुनि श्रीमुर्तिचे असुध पुसिलें : मग सर्वज्ञ म्हणीतलें : “बोल्हेया : आतां तुम्हीं राहा ना : मुगुताबाइ अवसरि करील :” राहिले :आणि गोसावीयांपासौनि तेयां स्तीति …

२४ बोल्हा बारीया स्तीती Read More »


शेअर करा
shri chakradhar swami

२३ मुगताबाइये भेटी

शेअर करा

गोसावी महादाईसा ला म्हणतात, “बाई, मुक्ताई कसली तापस्विनी होती. साधना करण्यात इतकी मग्न होती की तिचे शरीराकडे अजिबात लक्ष देणे होत नव्हते. अंगावरचे लव (केस) इतके वाढले होते की ते पहाळी गेले. नखे इतकी वाढली की हातापायांच्या नखाच्या चुंभळी वाळलेल्या. डोक्यावरच्या जटा जमिनीपर्यंत पोचलेल्या. दात देखील शेवाळलेले झाले होते. ती बसली तर जटा भुईवर जमा होत. उभी ठाकली तरी जटा भुईपर्यंत पोचत.


शेअर करा
shri chakradhar swami

२२ पर्वतों क्रीडा

शेअर करा

ऐसीया उघडीया श्रीमूर्ती खडेयांगोटेयांआंतु पहुडु स्वीकरीति : ऐसीयापरी गोसावीं पर्वतीं बारा वरीखें क्रीडा केली : मग मुगुताबाइये गोसावीं भेटि दीधली : ।। अशा प्रकारे स्वामी उघड्या अंगाने दगडधोंडे असलेल्या ठिकाणी आराम करीत. या प्रकारे स्वामीं पर्वतावर 12 वर्ष राहिले. मग त्यांची थोर योगोनी मुक्ताबाईंशी भेट झाली.


शेअर करा
shri chakradhar swami

२१ अवस्थास्वीकारू

शेअर करा

गोसावी उघडेच फिरत. त्यांच्या अंगावर काट्यांनी ओरखडे निघत. त्यातून रुधिराचे थेंब निघे. ते शरीरावरच वाळत. या लाल रक्ताबिंदूंमुळे स्वामींचे शरीर माणिक मोत्यांनी जणू सजवले आहे असे भासे. त्यांचे केसदेखील झाडांत, काट्यात गुंतत असे. परंतु ते आपले केस सोडवत नसत. गोसावी तसेच निश्चेष्ट उभे राहत. जर वाऱ्याने त्यांचे केस सुटले तर ते पुढे निघत. किंवा रस्त्याने कुणी आला आणि त्याने जर हे केस सोडवले तरच गोसावी पुढे निघत.


शेअर करा
shri chakradhar swami

२० स्रीप्रभू भेटि

शेअर करा

मग गोसावीयांची स्रीमूर्ति सावीयांचि संकीर्ण’ जाली : मग गोसावीयांचीया माता प्रधानातें वीनवीलें : “कुमरू सावीयां संकीर्षु जाला : तरि रामयात्रे पाठवीजे ना कां : तवं तेही म्हणीतलें : “आम्ही राजे : राजेयासि काइ केही जाणे असे? राजा प्रोहीतद्वारें क्रीया कीजे : ब्राह्मणातें पाठौनि : ते प्रोहीतद्वारें यात्रा करूनि येती :” तें गोसावीयांसि मानेचि ना : …

२० स्रीप्रभू भेटि Read More »


शेअर करा
shri chakradhar swami

१९ उदास्यस्वीकारू

शेअर करा

तें निमीत्य करूनि गोसावीं उदास्य स्वीकरिलें : मग एककू दीसु गोसावी येककू पदार्थे वर्जीते जाले : गोसावीयांसि रामयाः बीजें करावेयाची प्रवृति : परि प्रधानु गोसावीयांतें न पठवी : मग येकू दीं मर्दनामादने वर्जीलें : एककू दी एककू पदायूँ वर्जीति : ऐसे अवघेचि पदार्थ वर्जीले : पुसति तरि गोसावी ऐसें म्हणति : “रामयात्रे जाउनि : मग …

१९ उदास्यस्वीकारू Read More »


शेअर करा

१३ खीरभोजनी वीस्मो

शेअर करा

द्वारके प्रदेसी एकी गांवीं श्राध : बाइला खीरि नीवों घातली होति : नीवों घालीतां पोळली : आणि तोंडी आंगुळीया घातलीया : गोसावी हास्य करूनि श्रीमुखीं आंगुळी घातली : तें माहाजनी पूसीलें : “राउळो : ऐसें काइ? ” गोसावी म्हणीतलें : “बाइला खीरी नीवों घातली होती : ते पोळली :” माहाजनी तोचि दीसू तोचि मासू लीहोनि …

१३ खीरभोजनी वीस्मो Read More »


शेअर करा
error: