marathi

११ चांपेल स्वीकारू

नारायणाचां देउळी दोनि घागरी करूनि चांपेलाच्या ठेवीलीया होतिया : तिया गोसावीं श्रीमुगुटावरी घेतलीया : वोतीलीया : तवं भोपां पूसीलें : “राउळो : एथ चांपेल होतें तें काइ केलें?” गोसावी म्हणीतलें : “एणे घेतलें :” म्हणौनि बोंबीएवरि’ श्रीकरीचे बोट ठेवीलें आणि बोंबीएहुनि’ चांपेल नीगाले : तेणे मागुती घागरी भरीलीया : तेयासि जालें : गांवीचेया लोकांसि जालें …

११ चांपेल स्वीकारू Read More »

१० वसो जीववणे

गावी एकू वसो असे : तो लींगावरीले फुलें प्रतदीनी खाए : तो एकू दीसू नीगतां सीरकला : तो सरला : ते देवतेसि पूजापूरस्कारू वर्जला : गोसावीयांसि गोमतीएचां तीरी आसन असे : भोपे आणि माहाजन गोसावीयांपासि आले : दंडवतें केली : श्रीचरणां लागले : मग वीनवीलें : “जी जी : वसो देवतेवरीलें फुलें प्रतदीनी खाए : …

१० वसो जीववणे Read More »

Bhagune or bhagone भगूने अथवा भगोणे

पूर्वीच्या काळी शेतकरी कुटुंबात एखादे धातूचे पातेले असायचे. पितळ, जर्मल किंवा स्टेनलेस स्टील चे. बाकी भांडी ही मातीची असायची. अर्थातच घराची कारभारीण हे भांडे अनेक कामासाठी वापरायची. पाहुण्यांचे चहापाणी यात व्हायचे, भाकरी करताना पिठात पाणी घालण्यासाठी याचा वापर व्हायचा. एखादे कालवण, कोरड्यास या भगोण्यात बनवले जायचे. भाज्यांचे किंवा सांडग्याचे पीठ कालवण्यासाठी याचा उपयोग व्हायचा. असे हे भगोणे त्या कारभरणीला हरघडी उपयोगी पडायचे.

Khallakada waralakada खाल्लाकडं म्हणजे काय रे पप्पा?

उद्या माझ्या मुलाच्या किंवा त्याच्या मुलाच्या कानावर हा शब्द पडलाच आणि त्याच्याही डोक्यात असाच किडा वाळवळला. आणि त्याने जर आपल्या बापाला विचारले की- “खाल्लाकडं म्हणजे काय रे पप्पा?” तर त्याला याचे उत्तर सांगणारे कोण असेल?

KANAA by Kusumagraj कणा

सर्व काही उध्वस्त झाल्यावर देखील काही माणसे हरत नाहीत, हरवत नाहीत. परिस्थितीशी समझौता करत नाहीत. ती पुन्हा उभी राहतात. नव्याने. अशा लोकांचे एकच ब्रीदवाक्य असते. “पाठीवरती हात ठेवून फक्त ‘लढ’ म्हणा. आशा लोकांबद्दलची, त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती बद्दलची, त्यांचा आशावाद व्यक्त करणारी कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता.

Un Un Khichadi ऊन ऊन खिचडी

अशाच एका कुटुंबात एक मुलगी जेंव्हा नववधू म्हणून जाते. सहाजिकच तिला तिथे जुळून घेण्याला त्रास पडतो. आणि मग ती फक्त नवरा-बायको असं वेगळं राहायचं खूळ डोक्यात घेते. आणि एक एक करून एकत्र कुटुंबातल्या समस्यांचा पाढाच सांगायला सुरुवात करते. शेवटी नवर्याला पटवून ती वेगळं राहायला जाते. वेगळं राहायला लागल्यावर तिला अनेक समस्या येतात. आणि मग वेगळं राहण्यामधील सुख याबाबतीत तिचा अपेक्षा भंग कसा होतो याचे मजेदार वर्णन मो. दा. देशमुख किंवा मोरेश्वर देशमुख यांनी आपल्या ऊन ऊन खिचडी या कवितेत आपल्याला केले आहे

वामांगी Vamangi by Arun Kolatkar

देवळात गेलो होतो मधे
तिथे विठ्ठल काही दिसेना
रखुमाय शेजारी
नुसती वीट
मी म्हणालो
असु दे
रखुमाय तर रखुमाय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायचं
पायावर ठेवलेलं
डोकं काढून घेतलं
आपल्यालाच पुढेमागे
लागेल म्हणून

shri chakradhar swami

१८ जुतक्रीडा

गोसावीयांसि सारी जुं खेळावेयाची प्रवृति : मग गोसावी प्रतदीनीं जूआंठेयासि बीजें करीति : सारी जुं खेळावेयाचें वेसन स्वीकरीति : गोसावी प्रतदीनीं सारी जुं खेळति : जीतुकाही जीणा ए तीतुका दानासि देति : एकु दीं गोसावीं हारिची प्रवृति स्वीकरिली : बहुत जुं हारवीलें : मग पाउगीयें पायांवरि हात ठेउनि वीनवीलें : “जी जी : आंखू पाहिजो …

१८ जुतक्रीडा Read More »

shri chakradhar swami

१७ पुरस्वीकारू How shri Changadev Raul transmigrated soul in to body of Harpal dev

श्री चांगदेव राऊळ यांनी आपले शरीर त्यागल्यानंतर भाडोच च्या राजकुमार हरपाळदेव यांच्या शरीरात कसा परकाया प्रवेश केला हे या लीळे मध्ये वर्णीले आहे

error: