October 2022

११ चांपेल स्वीकारू

नारायणाचां देउळी दोनि घागरी करूनि चांपेलाच्या ठेवीलीया होतिया : तिया गोसावीं श्रीमुगुटावरी घेतलीया : वोतीलीया : तवं भोपां पूसीलें : “राउळो : एथ चांपेल होतें तें काइ केलें?” गोसावी म्हणीतलें : “एणे घेतलें :” म्हणौनि बोंबीएवरि’ श्रीकरीचे बोट ठेवीलें आणि बोंबीएहुनि’ चांपेल नीगाले : तेणे मागुती घागरी भरीलीया : तेयासि जालें : गांवीचेया लोकांसि जालें …

११ चांपेल स्वीकारू Read More »

१० वसो जीववणे

गावी एकू वसो असे : तो लींगावरीले फुलें प्रतदीनी खाए : तो एकू दीसू नीगतां सीरकला : तो सरला : ते देवतेसि पूजापूरस्कारू वर्जला : गोसावीयांसि गोमतीएचां तीरी आसन असे : भोपे आणि माहाजन गोसावीयांपासि आले : दंडवतें केली : श्रीचरणां लागले : मग वीनवीलें : “जी जी : वसो देवतेवरीलें फुलें प्रतदीनी खाए : …

१० वसो जीववणे Read More »

९ श्राधग्रहीं आरोगण

कव्हणां एकाचां घरीं श्राध होत होतें : तेथ गोसावी एती म्हणौनि नीर्वडी केली: दारवठा घातला : गोसावीं तेथ उत्पवन करूनि बीजें केलें : खीरीची दोनि अळदी नीवतें घातली होती : तेथ आरोगणा केली : मग मूत्र केलें : तें सोनें रूपें जालें : मग तेथौनि बीजें केलें :॥.      कुणा एकाच्या घरी श्राद्ध होते. …

९ श्राधग्रहीं आरोगण Read More »

८ सारंगधरा उचीष्ट बोने सूववणे

गोसावी’ आसनी उपविष्ट असति : जवळे कव्हणी बैसले असति : तेहीं पूसीलें : “हे काइ जी : उचीष्ट बोणें कैसें ?” गोसावी म्हणीतलें : “सारंगधराचा भोपा : दीवा जात होता : ते वाति गेली : म्हणौनि बोटें आबूथीली : तो पोळला : तैसीचि तोंडी आंगुळी सूदली : तैसेंचि सारंगधरा बोणे दाखवीलें :” तोचि मासू : …

८ सारंगधरा उचीष्ट बोने सूववणे Read More »

७ सारंगधराचा चांदोवा वीझवणे

गोसावी आसनी उपविष्ट असति : एकू दीस गावीचे माहाजन बैसले असति : तवं गोसावी हास्य करूनि श्रीकर कुसकरीले : तवं काळे जाले : मग तेहीं पूसीलें : “जी जी : श्रीकर काळे कां जाले?” गोसावी म्हणीतलें : “सारंगधरीचे भोपे सारंगधरासि आर्ती करीत होते : ते चांदोवेयासि आगी लागली : ते एथौनि वीझवीली :” तवं तेयांसि …

७ सारंगधराचा चांदोवा वीझवणे Read More »

६ वाराणसी जनु नेणे आणणे

वाराणसी’ अवघा पव्हा नीगाला : येके दोघे राहीली : तीयें दुख करूं लागली : गोसावीयांतें म्हणति ‘काइ करूंजी : अवघा पव्हा गेला : आम्ही राहीलों :” गोसावीं म्हणीतले : “आम्ही तुमतें नेउनु :” जीए दीसी पव्हा गेला : वाराणसी पावला :तीए दीसी तीयें जनें नेली : तीये अवघेन लोकें देखीली : तेयांतें पूसीलें : “तुम्हीं …

६ वाराणसी जनु नेणे आणणे Read More »

५ कऱ्हे कुचकी आसन

कव्हणी एकू ब्राम्हणू द्वारावतीएसि नीगाला : तवं काबा वाट घेतली : आवघे गेलें: बैलू गेलाः बाइला भवरी तोंडी घातली होती:तेवांचलीः द्वारावतीये सहश्रभोजन करीन म्हणौनि नीगाला होता : द्वारावती पावला : सप्ततीर्थीया केलिया : एरी दीसी ब्राम्हणां नीमंत्रण दिधलें : इतुलेनि तो म्हणों लागला : “वेचू नाहीं : वेचैवीन काइ करूं?” मग ब्राम्हणीं भवरि दाखवीली : …

५ कऱ्हे कुचकी आसन Read More »

४ रवळेयां गीतस्रवणों नीर्वंसू कथन Ravaleya sings song in front of Shri Chakrapani

रवळेन’ कुंभारें गीतू केला : गोसावीयांसि गोमतीचां तिरी गुंफा : तेथ आसन असे : तो तेथ आला : गोसावीयांपुढां गीतू म्हणीतला : तवं गोसावी उगेचि : मग तेणें पुसिलें : “जी जी : गीतू कैसा जाला?” सर्वतें म्हणीतलें : “तूझा नीर्वंसू होए ऐसा जाला : “.    रवळ्या कुंभाराने एक अध्यात्मिक गीत रचले. गोसावींची गोमतीच्या …

४ रवळेयां गीतस्रवणों नीर्वंसू कथन Ravaleya sings song in front of Shri Chakrapani Read More »

nirvaan-shatakam-निर्वाण-षटकम्/

भगवद गीता जरी वेदांत तत्वज्ञानाचे सार असले तरी त्याहीपेक्षा कमी शब्दांमध्ये वेदांत तत्वज्ञानाचे सार स्वतः शंकराचार्यांनी सांगून ठेवलेले आहे. हे सार त्यांनी केवळ सहा कडव्यांमध्ये सांगून टाकले. या सहा कडव्यानाच षटकम् असे म्हटले आहे. आणि या षटकांमध्ये आत्म म्हणजे काय किंवा मी कोण आहे हे सांगितले असल्यामुळे यालाच ‘आत्मषटकम्’ असेही म्हणतात. आत्म्याचे स्वरूप जाणून घेतल्यावर निर्वाण प्राप्त होते. त्यामुळे याला ‘निर्वाण षटकम्’ असेही नाव आहे.

error: