मी माझा

sant_tukaram

वीट

शेअर करा

‘प्रभात, चा संत तुकाराम हा चित्रपट पाहून बऱ्याच जणांचे असे मत बनले आहे.  वारकरी संप्रदायात संत तुकारामांनी सदेह वैकुंठगमन केले अशी एक कथा आहे. जेंव्हा त्यांना घ्यायला विमान येते तेंव्हा ते आपल्या पत्नी जिजाऊ ला देखील विमानात बसून वैकुंठाला घेऊन जाऊ इच्छितात. परंतु अध्यात्माचे आणि परमार्थाचे महत्त्व न कळलेली जिजाऊ वैकुंठाला जाण्यास नकार देते अशी कथा काही कीर्तनकार सांगतात.  वारकरी संप्रदायातील व्यक्तींना जिजाऊ हे एक परमार्थाची जाणीव नसलेले पात्र वाटते. परंतु खरंच जिजाऊ अशा होत्या का?


शेअर करा

अंधाराला छेदण्याची गरज आहे

शेअर करा

सोशल मीडियावरील कचऱ्यात कधीकधी खूप चांगले हिरे-माणिक सापडतात. ही अशीच एक कविता नाना पाटेकर च्या नावावर आहे.  नाना या कवितेचा कवी आहे की नाही हे पक्के माहीत नाही. पण कविता मात्र छान आहे.  आवडली आहे म्हणून तुमच्या सोबत शेअर करतोय


शेअर करा
books

पुस्तकं

शेअर करा

पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की त्याच्या मुलाने/मुलीने देखील हा छंद जोपासावा. त्याने/तिने देखील पुस्तके वाचावी. त्यांनी पुस्तके का वाचावी याविषयी कवी सौमित्र याने खूप सुंदर कविता लिहून ठेवली आहे. एका अर्थाने पुस्तक वाचल्याने काय होते याविषयीचा सुंदर लेखच आहे हा. ही सुंदर कविता जाणकार वाचकांसाठी आणि कविता प्रेमींसाठी.


शेअर करा

किस्से वैज्ञानिकांचे

शेअर करा

वैज्ञानिकांचे जीवन प्रयोगशाळेत आणि प्रयोगशाळेबाहेर अनेक विस्मयकारक घटनांनी भरलेलं असतं. अशा घटनांचे किस्से तयार होतात. जितका वैज्ञानिक अधिक प्रसिद्ध तितके अधिक किस्से. त्यातून वैज्ञानिकांच मानवी स्वभावाचं, तंच बुद्धिमत्तेचं आणि मोठेपणाचं दर्शन घडत असतं. हे किस्से जसे गमतीदार असतात तसेच ते उद्बोधकही असतात. त्यामुळेच ते विज्ञानाच इतिहासाचा भाग बनून जातात. त्यातूनच त्यांचे महत्त्व अधोरेखित होतं. प्रसिद्ध वैज्ञानिकांच जीवनात घडलेले असे काही किस्से.


शेअर करा

माझा मराठवाडा

शेअर करा

मराठवाडा ही गौरवाने सांगण्याजोगा वारसा असणारी संतांची तशीच लढवय्यांची जमीन. विकासाची क्षमता असणारी जिद्दी माणसांची भूमी. पण आकांक्षा आहे महाराष्ट्राच्या गौरवात एकजीव होण्याची. मराठवाड्याचे निराळेपण संपावे ही. आणि खंत आहे याची की हे घडून येण्याऐवजी मराठवाडा या नावाने लढत राहणे आम्हांला भाग पाडले जात आहे याची. 


शेअर करा

Heroism and Fearlessness शौर्य व साहस

शेअर करा

एखादा जवान जेव्हा एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी आपला जीव धोक्यात घालतो किंवा एखाद्या अशा क्षणी तो झडप घेतो जेव्हा त्याला माहीत असते की यात आपला प्राण जाणार आहे तेव्हा अशा क्षणी त्याला हा निर्णय घ्यायला भाग पाडणारा विचार काय असतो?

भगवद्गीतेत सांगितलेले
‘हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्’
हे तत्वज्ञान त्याच्या मनात असते की इतर कुठली प्रेरणा? हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला सांगता येणार नाही.
हे तोच सांगू शकेल जो या चक्रव्यूहामध्ये शिरला आहे. अनेक वेळा….. अनेक प्रसंगी….


शेअर करा
NOT-POEM-BY-ERIN-HANSON

Not

शेअर करा

मी, आपण कोण आहोत खरोखर? अनेक जणांनी या आदिम प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. अनेकांना आपले उत्तर सापडले देखील. असेच एक साधे सरल उत्तर या कवितेतही आहे. सुरुवात जरी नेती-नेती च्या सुरात तू ही नाहीस तू ते नाहीस अशी असली तरी नंतर मात्र कवितेने एखाद्या व्यक्तिमत्वाचा अंतस्थ धांडोळा घेणाऱ्या गोष्टींना गौरवान्वित करत ‘कोहम’ (who am I?) चे सुंदर उत्तर प्रस्तुत केले आहे. जाता जाता कवि ही देखील सांगून जातो की बेगडी गोष्टींच्या मागे लागल्यामुळे तू मूळ कोण आहेस याची आत्मविस्मृती तुला झाली आहे.


शेअर करा
my school

माझी शाळा

शेअर करा

आपली शाळा आणि बालपणीच्या शाळे विषयीच्या आठवणी या कवितेतून कवि कबीर यांनी सादर केल्या आहेत. आपल्याला ही कविता निश्चित आवडेल अशी आशा.


शेअर करा

nirvaan-shatakam-निर्वाण-षटकम्/

शेअर करा

भगवद गीता जरी वेदांत तत्वज्ञानाचे सार असले तरी त्याहीपेक्षा कमी शब्दांमध्ये वेदांत तत्वज्ञानाचे सार स्वतः शंकराचार्यांनी सांगून ठेवलेले आहे. हे सार त्यांनी केवळ सहा कडव्यांमध्ये सांगून टाकले. या सहा कडव्यानाच षटकम् असे म्हटले आहे. आणि या षटकांमध्ये आत्म म्हणजे काय किंवा मी कोण आहे हे सांगितले असल्यामुळे यालाच ‘आत्मषटकम्’ असेही म्हणतात. आत्म्याचे स्वरूप जाणून घेतल्यावर निर्वाण प्राप्त होते. त्यामुळे याला ‘निर्वाण षटकम्’ असेही नाव आहे.


शेअर करा
error: