मी माझा

सुंदर मराठी भाषा

मराठी भाषा अतिशय चमत्कार करू शकणारि आहे.जेवढे लालित्य भषाविलास, वाग्वैभव संस्कृत दाखवु शकते तेवढेच सामर्थ्य मराठीमधेहि आहे.व्याकरण, अलंकार, शब्दविभ्रम, वृत्तरचना यांचा समृद्ध असा खजिना हा संत अनि पंत कविमंडळींनी आनि शाहिरि कवींनि वारसारुपाने मागे ठेवलेला आहे. अतिशयोक्ति अलंकार मुंगी व्याली शिंगि झाली तिचे दूध किती?अठरा रांजन भरुन उरले प्याले दोन हत्ती. दमडिचं तेल आणलंमामाजींची शेंडि …

सुंदर मराठी भाषा Read More »

है अँधेरी रात – Hai Andheri Raat

कल्पना के हाथ से कमनीय जो मंदिर बना थाभावना के हाथ ने जिसमें वितानों को तना थास्वप्न ने अपने करों से था जिसे रुचि से सँवारास्वर्ग के दुष्प्राप्य रंगों से, रसों से जो सना थाढह गया वह तो जुटाकर ईंट, पत्थर, कंकड़ों कोएक अपनी शांति की कुटिया बनाना कब मना हैहै अँधेरी रात पर दीवा जलाना कब मना …

है अँधेरी रात – Hai Andheri Raat Read More »

चिडिया और चुरुगन

हरिवंशराय बच्चन यांच्या अनेक सुंदर कवितांपैकी एक कविता म्हणजे चिडिया और चुरुगन होय.
आपल्या आई वडिलांच्या अभ्यासक्रमात ही कविता होती….चिमणीचे एक सुंदरसे पिल्लू … जे अतिशय उत्सुकतेने आणि आश्चर्याने या जगाकडे बघते. आपल्यासारख्याच दिसणार्‍या पक्षांना उडतांना पाहून त्याला अतिशय आनंद होतो आणि अनिवार ओढ लागते की आपल्याला कधी उडता येईल?

Yashawant vyakhyanmala ambad vakte

मी कसा घडलो

अंबड शहरांमध्ये 2011 सालापासून काही होतकरू तरुणांचा एक चांगला गट दरवर्षी यशवंत व्याख्यानमालेचे आयोजन करतो. या वर्षी 2020 साली या व्याख्यान माले ने आपले दहावी पुष्प गुंफले. मराठवाड्यामधील ग्रामीण भागात आणि अंबड सारख्या शहरात तरुणांनी दहा वर्ष एक उत्कृष्ट व्याख्यानमाला सुरू करणे आणि ती दहा वर्षे यशस्वीपणे राबवणे हे मला वाटतं त्यांच्या कामाची आणि यशाची पावती आहे. पद्मश्री रवींद्र कोल्हे, सुपर थर्टी चे जनक प्रा. आनंद कुमार, हनुमंतराव गायकवाड, साहित्यिक डॉ. रा. र. बोराडे आणि डॉ. उत्तम कांबळे, विधिज्ञ असीम सरोदे, मुक्ता दाभोळकर अशांसारख्या दिग्गज वक्त्यांना बोलावून त्यांनी अंबड सारख्या मराठवाड्यातल्या आमचा भागांमध्ये हा ज्ञानाचा वटवृक्ष रुजवला. अशा या व्याख्यानमाले मध्ये 2012 साली मी युपीएससी स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर मला व्याख्यानाचे पुष्प गुंफण्याची संधी मिळाली. यशवंत व्याख्यानमाले ने दशकपूर्ती चा मुहूर्त साधून व्याख्यान माले मध्ये ज्यांचे ज्यांचे व्याख्यान झाले त्यांच्या व्याख्यानांची एक स्मरणिका काढली. माझे व्याख्यान ध्वनिमुद्रित केलेले नसल्यामुळे मला माझे व्याख्यान पुन्हा लिहून काढण्याचे विनंती करण्यात आली. व्याख्यानमालेत व्याख्यान देऊन दहा वर्ष झाल्यानंतर मला ही विनंती ती करण्यात आली होती. त्यामुळे मी त्या विषयावर जे काही बोललो होतो ते जसे आठवले तसे थोडक्यात लिहून काढले आहे. हा लेख त्या स्मरणिकेत प्रकाशित करण्यात आलेला आहे. तोच लेख मी आज इथे तुमच्यासोबत शेअर करतो आहे.

error: