-
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे महत्व
प्रथम ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, हैदराबादचा लढा हा केवळ संस्थानच्या विलीनीकरणाचा लढा नाही तर तो भारताच्या प्रादेशिक सलगतेचा आणि भारताच्या भारत म्हणून अस्तित्वात येण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे. केवळ एका संस्थानाच्या विलीनीकरणाचा लढा या नात्याने आपण आता या लढ्याकडे पाहता कामा नये.
-
प्रार्थना समाज आणि महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात
यातूनच मिशनरी मंडळींचा खोटेपणा आणि त्यांच्या तर्का मागील फोलपणाही त्यांना जाणवायला सुरुवात झाली. बायबलमधील चमत्कारिक व अप्रमाण वाटणाऱ्या बाबीदेखील विचारवंतांच्या लक्षात आल्या. त्यामागचा धर्मांतराचा गुप्त आणि लबाड हेतु त्यांना जाणवल्याशिवाय राहिला नाही. या सर्व गोष्टींमुळे आपल्या धर्माचा त्याग (धर्मांतर) करण्या ऐवजी आपल्या धर्माची आणि समाजाची नव्या युगाला साजेशी सुधारणा करण्याचा विचार समोर आला.
-
कोहिनूर हिरा आणि दिल्लीतील भीषण कत्तल
नादिरशहा अक्षरश चवताळला. नादिरशहा ने इतिहासात कुप्रसिध्द असलेली ‘दिल्लीची कत्तल’ घडवून आणली. त्याने आपल्या सैन्यास दिल्लीत सरसकट कत्तल करण्याचा हुकूम दिला. तो 22 मार्च 1739 ला सुनहरी मशिदीत आला. नगारे आणि तुतारींच्या घोषात त्याने आपल्या सैनिकांसमोर आपली तलवार म्यानातून बाहेर काढून हवेत उंच धरली. सैनिकांसाठी हा कत्ल-ए-आम चा आदेश होता. हजारो शस्त्रधारी सैनिक रस्त्यावर उतरले…