शक्ति और क्षमा shakti aur kshama
युधिष्ठिराचे मन युद्धाने उद्विग्न झालेले असते . त्याला प्रामाणिकपणे वाटत असते की या प्रचंड नरसंहाराला तोच जबाबदार आहे. त्याने जर मनात आणले असते तर तो हे युद्ध थांबू शकला असता. युधिष्ठिराला वाटते की एवढ्या सर्व बांधवांना आणि क्षत्रियांना मारून मिळवलेला हा विजय रक्तलांछित आहे, कलंकित आहे. त्यामुळे न महाभारताच्या विजयाला अर्थ आहे, न त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या राजसत्तेला. पश्चातापाने दग्ध होऊन युधिष्टिर हे जाहीर करतो की त्याची जगण्याची देखील इच्छा राहिलेली नाही.
पण येथे भीष्मांमधील खरा राजकारणी, नीतिज्ञ आणि खरा क्षत्रिय आपल्यासमोर रामधारी सिंह दिनकर उभा करतात.