आवडत्या कविता

शेअर करा

जगण्याच्या लढाईत जेंव्हा समस्यांच्या झळा मला होरपळून काढतात तेंव्हा विसावा देणाऱ्या आणि या झळा कमी करणाऱ्या काही गोष्टी आयुष्यात आहेत हे सुदैव. अशा दिलासा देणाऱ्या गोष्टींमध्ये पुस्तकं आणि त्यातल्या त्यात काव्य यांचा नंबर वरचा. ललित लिखाण प्रकार खूप पूर्वीच वाचून झाल्यामुळे म्हणा किंवा इतर काही कारणांमुळे म्हणा माझे वाचन ललितेतर गोष्टींकडे जास्त झुकले आहे. ललित वाङ्मय प्रकार वाचनासाठी घेण्याबाबत मी फारच चोखंदळ ( choosy)झालो आहे. अशामध्ये फक्त कवितांनी, माझे बोट पकडून ठेवले आहे, ललित वाङ्मयाशी जोडून ठेवले आहे.

अशा या होरपळून काढणाऱ्या दुनियेत शिरळ ( ढगांची सावली) जशी तजेला देते तशी मला क्षणभर विसावा देणाऱ्या, माझ्या डोक्यावर सावली धरणाऱ्या कवितांना हे पेज समर्पित.

  • वीट
    ‘प्रभात, चा संत तुकाराम हा चित्रपट पाहून बऱ्याच जणांचे असे मत बनले आहे.  वारकरी संप्रदायात संत तुकारामांनी सदेह वैकुंठगमन केले अशी एक कथा आहे. जेंव्हा त्यांना घ्यायला विमान येते तेंव्हा ते आपल्या पत्नी जिजाऊ ला देखील विमानात बसून वैकुंठाला घेऊन जाऊ इच्छितात. परंतु अध्यात्माचे आणि परमार्थाचे महत्त्व न कळलेली जिजाऊ वैकुंठाला जाण्यास नकार देते अशी कथा काही कीर्तनकार सांगतात.  वारकरी संप्रदायातील व्यक्तींना जिजाऊ हे एक परमार्थाची जाणीव नसलेले पात्र वाटते. परंतु खरंच जिजाऊ अशा होत्या का?
  • अंधाराला छेदण्याची गरज आहे
    सोशल मीडियावरील कचऱ्यात कधीकधी खूप चांगले हिरे-माणिक सापडतात. ही अशीच एक कविता नाना पाटेकर च्या नावावर आहे.  नाना या कवितेचा कवी आहे की नाही हे पक्के माहीत नाही. पण कविता मात्र छान आहे.  आवडली आहे म्हणून तुमच्या सोबत शेअर करतोय
  • पुस्तकं
    पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की त्याच्या मुलाने/मुलीने देखील हा छंद जोपासावा. त्याने/तिने देखील पुस्तके वाचावी. त्यांनी पुस्तके का वाचावी याविषयी कवी सौमित्र याने खूप सुंदर कविता लिहून ठेवली आहे. एका अर्थाने पुस्तक वाचल्याने काय होते याविषयीचा सुंदर लेखच आहे हा. ही सुंदर कविता जाणकार वाचकांसाठी आणि कविता प्रेमींसाठी.
  • Not
    मी, आपण कोण आहोत खरोखर? अनेक जणांनी या आदिम प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. अनेकांना आपले उत्तर सापडले देखील. असेच एक साधे सरल उत्तर या कवितेतही आहे. सुरुवात जरी नेती-नेती च्या सुरात तू ही नाहीस तू ते नाहीस अशी असली तरी नंतर मात्र कवितेने एखाद्या व्यक्तिमत्वाचा अंतस्थ धांडोळा घेणाऱ्या गोष्टींना गौरवान्वित करत ‘कोहम’ (who am I?) चे सुंदर उत्तर प्रस्तुत केले आहे. जाता जाता कवि ही देखील सांगून जातो की बेगडी गोष्टींच्या मागे लागल्यामुळे तू मूळ कोण आहेस याची आत्मविस्मृती तुला झाली आहे.
  • माझी शाळा
    आपली शाळा आणि बालपणीच्या शाळे विषयीच्या आठवणी या कवितेतून कवि कबीर यांनी सादर केल्या आहेत. आपल्याला ही कविता निश्चित आवडेल अशी आशा.
  • nirvaan-shatakam-निर्वाण-षटकम्/
    भगवद गीता जरी वेदांत तत्वज्ञानाचे सार असले तरी त्याहीपेक्षा कमी शब्दांमध्ये वेदांत तत्वज्ञानाचे सार स्वतः शंकराचार्यांनी सांगून ठेवलेले आहे. हे सार त्यांनी केवळ सहा कडव्यांमध्ये सांगून टाकले. या सहा कडव्यानाच षटकम् असे म्हटले आहे. आणि या षटकांमध्ये आत्म म्हणजे काय किंवा मी कोण आहे हे सांगितले असल्यामुळे यालाच ‘आत्मषटकम्’ असेही म्हणतात. आत्म्याचे स्वरूप जाणून घेतल्यावर निर्वाण प्राप्त होते. त्यामुळे याला ‘निर्वाण षटकम्’ असेही नाव आहे.
  • KANAA by Kusumagraj कणा
    सर्व काही उध्वस्त झाल्यावर देखील काही माणसे हरत नाहीत, हरवत नाहीत. परिस्थितीशी समझौता करत नाहीत. ती पुन्हा उभी राहतात. नव्याने. अशा लोकांचे एकच ब्रीदवाक्य असते. “पाठीवरती हात ठेवून फक्त ‘लढ’ म्हणा. आशा लोकांबद्दलची, त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती बद्दलची, त्यांचा आशावाद व्यक्त करणारी कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता.
  • Un Un Khichadi ऊन ऊन खिचडी
    अशाच एका कुटुंबात एक मुलगी जेंव्हा नववधू म्हणून जाते. सहाजिकच तिला तिथे जुळून घेण्याला त्रास पडतो. आणि मग ती फक्त नवरा-बायको असं वेगळं राहायचं खूळ डोक्यात घेते. आणि एक एक करून एकत्र कुटुंबातल्या समस्यांचा पाढाच सांगायला सुरुवात करते. शेवटी नवर्याला पटवून ती वेगळं राहायला जाते. वेगळं राहायला लागल्यावर तिला अनेक समस्या येतात. आणि मग वेगळं राहण्यामधील सुख याबाबतीत तिचा अपेक्षा भंग कसा होतो याचे मजेदार वर्णन मो. दा. देशमुख किंवा मोरेश्वर देशमुख यांनी आपल्या ऊन ऊन खिचडी या कवितेत आपल्याला केले आहे
  • अर्धसत्य Ardhsatya
    अजून जास्त काय सांगु?. तेंडुलकरांची पटकथा, निहिलांनीचे दिग्दर्शन, ओमपुरी आणि सदाशिव अमरापूरकरांचा अभिनय, स्मिता पाटीलची सहज पण दमदार भूमिका, गुलाबी स्वप्न न दाखवता आयुष्याचे भीषण वास्तव दाखवणारी पटकथा, या एकेका कारणासाठी हा चित्रपट आवर्जून पहावा असाच आहे. पण केवळ या कवितेसाठी देखील हा चित्रपट पाहता येईल.
  • वामांगी Vamangi by Arun Kolatkar
    देवळात गेलो होतो मधे तिथे विठ्ठल काही दिसेना रखुमाय शेजारी नुसती वीट मी म्हणालो असु दे रखुमाय तर रखुमाय कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं आपल्यालाच पुढेमागे लागेल म्हणून
  • ईंधन Indhan
    बालपणीच्या रम्य आठवणींवर अनेक कवींनी सुंदर कविता लिहिल्या आहेत. इंधन ही अशीच ही गुलजार यांची सुंदर कविता. पण ही केवळ बालपणीच्या रम्य आठवणींची कविता नाही. आपल्या नजरेसमोर जीवलग मित्रांच्या मृत्यू पाहणार्‍या एका प्रतिभावंताची ही कविता आहे.एका विषयापासून सुरुवात करून अत्यंत वेगळा आणि गंभीर शेवट करण्याची गुलजार यांना विलक्षण हातोटी आहे. गुलजार यांची त्रिवेणी आणि इतर काव्य ज्यांनी वाचली असेल त्यांना या त्यांच्या सामर्थ्याची पूर्ण कल्पना असेल ….. गाईच्या शेणाच्या गोवर्‍या थापतेवेळी बालवयात खेळलेले खेळ आणि त्याच्या आठवणी मित्राच्या मृत्यूनंतर अस्वस्थ करतात …. कवीस आणि तुम्हा-आम्हासही
  • कृष्ण कि चेतावणी (Krishna ki chetavani)
    वर्षों तक वन में घूम घूम, बाधा विघ्नों को चूम चूमसह धूप घाम पानी पत्थर, पांडव आये कुछ और निखर सौभाग्य न सब दिन होता है, देखें आगे क्या होता है मैत्री की राह दिखाने को, सब को सुमार्ग पर लाने कोदुर्योधन को समझाने को, भीषण विध्वंस बचाने को भगवान हस्तिनापुर आए, पांडव का संदेशा लाये दो न्याय अगर तो …

    कृष्ण कि चेतावणी (Krishna ki chetavani) Read More »

  • शक्ति और क्षमा shakti aur kshama
    युधिष्ठिराचे मन युद्धाने उद्विग्न झालेले असते . त्याला प्रामाणिकपणे वाटत असते  की या प्रचंड नरसंहाराला तोच जबाबदार आहे. त्याने जर मनात आणले असते तर तो हे युद्ध थांबू शकला असता. युधिष्ठिराला वाटते की एवढ्या सर्व बांधवांना आणि क्षत्रियांना मारून मिळवलेला हा विजय रक्तलांछित आहे, कलंकित आहे. त्यामुळे न महाभारताच्या विजयाला अर्थ आहे, न त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या राजसत्तेला. पश्चातापाने दग्ध होऊन युधिष्टिर हे जाहीर करतो की त्याची जगण्याची देखील इच्छा राहिलेली नाही.    पण येथे भीष्मांमधील खरा राजकारणी, नीतिज्ञ आणि खरा क्षत्रिय आपल्यासमोर रामधारी सिंह दिनकर उभा करतात.
  • आषाढस्य प्रथम दिवसे अर्थात मेघदूत हिन्दी मे
    ऐसा ही एक प्रेमकाव्य हैं ’मेघदूतम’। जिसे दुनियाभर के बुद्धीजीवीयों ने सराहा हैं, चाहा है। यह एक प्रेमसन्देश है। जिसे शापीत यक्ष ने अपनि प्रिया के लिये मेघरुप सन्देशवाहक के साथ भेजा है। यक्ष केवल प्रियतम के लिये सन्देश ही नहि भेजता अपितू मेघ को वहां तक जाने का मार्ग भी बताता है। उस मार्ग में आने वाले नगर, नगरजन, नदियाँ, पर्वत और निसर्ग इन सब की विशेषताओं का भी वर्णन करता है। किंतु प्रेमसन्देश इस काव्य की आत्मा है। 
  • है अँधेरी रात – Hai Andheri Raat
    कल्पना के हाथ से कमनीय जो मंदिर बना थाभावना के हाथ ने जिसमें वितानों को तना थास्वप्न ने अपने करों से था जिसे रुचि से सँवारास्वर्ग के दुष्प्राप्य रंगों से, रसों से जो सना थाढह गया वह तो जुटाकर ईंट, पत्थर, कंकड़ों कोएक अपनी शांति की कुटिया बनाना कब मना हैहै अँधेरी रात पर दीवा जलाना कब मना …

    है अँधेरी रात – Hai Andheri Raat Read More »

  • चिडिया और चुरुगन
    हरिवंशराय बच्चन यांच्या अनेक सुंदर कवितांपैकी एक कविता म्हणजे चिडिया और चुरुगन होय. आपल्या आई वडिलांच्या अभ्यासक्रमात ही कविता होती….चिमणीचे एक सुंदरसे पिल्लू … जे अतिशय उत्सुकतेने आणि आश्चर्याने या जगाकडे बघते. आपल्यासारख्याच दिसणार्‍या पक्षांना उडतांना पाहून त्याला अतिशय आनंद होतो आणि अनिवार ओढ लागते की आपल्याला कधी उडता येईल?

शेअर करा
error: