मराठी

marathi_shala

मराठी शाळा जिंदाबाद Education in marathi medium or english medium?

शेअर करा

खाजगी शाळांच्या मनमानी आणि पैसे ओरबाडण्याच्या वृत्तीला कंटाळून प्रशांत मोदी या पालकाने मागील वर्षी साताऱ्यातील एका नामवंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून मुलाला काढून साताऱ्यातीलच जिल्हापरिषदेच्या श्री प्रतापसिंह हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला. त्याविषयीचे त्यांचे मनोगत


शेअर करा

Bhagune or bhagone भगूने अथवा भगोणे

शेअर करा

पूर्वीच्या काळी शेतकरी कुटुंबात एखादे धातूचे पातेले असायचे. पितळ, जर्मल किंवा स्टेनलेस स्टील चे. बाकी भांडी ही मातीची असायची. अर्थातच घराची कारभारीण हे भांडे अनेक कामासाठी वापरायची. पाहुण्यांचे चहापाणी यात व्हायचे, भाकरी करताना पिठात पाणी घालण्यासाठी याचा वापर व्हायचा. एखादे कालवण, कोरड्यास या भगोण्यात बनवले जायचे. भाज्यांचे किंवा सांडग्याचे पीठ कालवण्यासाठी याचा उपयोग व्हायचा. असे हे भगोणे त्या कारभरणीला हरघडी उपयोगी पडायचे.


शेअर करा

Khallakada waralakada खाल्लाकडं म्हणजे काय रे पप्पा?

शेअर करा

उद्या माझ्या मुलाच्या किंवा त्याच्या मुलाच्या कानावर हा शब्द पडलाच आणि त्याच्याही डोक्यात असाच किडा वाळवळला. आणि त्याने जर आपल्या बापाला विचारले की- “खाल्लाकडं म्हणजे काय रे पप्पा?” तर त्याला याचे उत्तर सांगणारे कोण असेल?


शेअर करा

KANAA by Kusumagraj कणा

शेअर करा

सर्व काही उध्वस्त झाल्यावर देखील काही माणसे हरत नाहीत, हरवत नाहीत. परिस्थितीशी समझौता करत नाहीत. ती पुन्हा उभी राहतात. नव्याने. अशा लोकांचे एकच ब्रीदवाक्य असते. “पाठीवरती हात ठेवून फक्त ‘लढ’ म्हणा. आशा लोकांबद्दलची, त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती बद्दलची, त्यांचा आशावाद व्यक्त करणारी कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता.


शेअर करा

Un Un Khichadi ऊन ऊन खिचडी

शेअर करा

अशाच एका कुटुंबात एक मुलगी जेंव्हा नववधू म्हणून जाते. सहाजिकच तिला तिथे जुळून घेण्याला त्रास पडतो. आणि मग ती फक्त नवरा-बायको असं वेगळं राहायचं खूळ डोक्यात घेते. आणि एक एक करून एकत्र कुटुंबातल्या समस्यांचा पाढाच सांगायला सुरुवात करते. शेवटी नवर्याला पटवून ती वेगळं राहायला जाते. वेगळं राहायला लागल्यावर तिला अनेक समस्या येतात. आणि मग वेगळं राहण्यामधील सुख याबाबतीत तिचा अपेक्षा भंग कसा होतो याचे मजेदार वर्णन मो. दा. देशमुख किंवा मोरेश्वर देशमुख यांनी आपल्या ऊन ऊन खिचडी या कवितेत आपल्याला केले आहे


शेअर करा

वामांगी Vamangi by Arun Kolatkar

शेअर करा

देवळात गेलो होतो मधे
तिथे विठ्ठल काही दिसेना
रखुमाय शेजारी
नुसती वीट
मी म्हणालो
असु दे
रखुमाय तर रखुमाय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायचं
पायावर ठेवलेलं
डोकं काढून घेतलं
आपल्यालाच पुढेमागे
लागेल म्हणून


शेअर करा
error: